maharashtra

अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 3 ऑक्टोबर रोजी दहा वाजण्याच्या सुमारास प्रज्वल पांडुरंग चव्हाण वय 36 राहणार रहिमतपूर तालुका कोरेगाव याने त्याच्या ताब्यातील एक्टिवा मोटरसायकल क्रमांक एमएच 11 सीटी 4561 या दुचाकीवरून रॉंग साईडने येऊन उत्तम साहेबराव माने वय 50 रा. रहिमतपूर ता. कोरेगाव यांना समोरून धडक दिली. या अपघातात उत्तम माने हे जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद चित्रा उत्तम माने वय 45 यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पो.हवा. एस. एन. जाधव करीत आहेत.