ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याची तार चोरून नेऊन त्यातील ऑइल सांडून नुकसान केल्याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याची तार चोरून नेऊन त्यातील ऑइल सांडून नुकसान केल्याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 27 सप्टेंबर रोजी च्या साडेदहा वाजण्याच्या पूर्वी राजाचे कुर्ले येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील 7 हजार 500 रुपये किमतीची तांब्याची 50 किलो वजनाची तार चोरून नेली असून ट्रान्सफॉर्मर मधील 2500 रुपये किमतीचे 300 लिटर ऑइल सांडून नुकसान केले आहे. याबाबतची फिर्याद तानाजी श्रीकृष्ण धुमाळ वय 35 यांनी औंध पोलीस ठाण्यात नोंदवली असून पोलीस हवालदार आर. एस. वाघ तपास करीत आहेत.