सातार्यातील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर याने हम करे सो कायदा या नीतीनुसार परिवहन कार्यालयात उच्छाद मांडलेला आहे. काही अडेलतट्टू एजंटांना हाताशी धरुन त्याने गेल्या काही वर्षांमध्ये कोट्यवधींची माया कमविलेली आहे.
कोंडवे, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ४२ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
दुखापत केल्याप्रकरणी कोंडवे, ता. सातारा येथील दोन जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
खंडाळा, ता. खंडाळा गावच्या हद्दीतून दोन जण बेपत्ता झाल्याची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
खंडाळा, ता. खंडाळा गावच्या हद्दीत पाय घसरून विहिरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
दोन जणांनी एकाला दुखापत केल्याप्रकरणी खावली, ता. वाई येथील दोघांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
येथील मंगळवार पेठेत दुर्गादेवी उत्सवात हवेत गोळीबार करून दहशत वाजवणाऱ्या चार जणांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह तीन मॅक्झिन व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
सातारा शहरातील चंदुकाका सराफ यांच्या दुकानात दागिन्यांची चौकशी करण्याच्या निमित्ताने आलेल्या एका महिलेने एक लाख 67 हजार रुपये किमतीची सोन्याची माळ हातच्यालाखीने लांबवली होती. या महिलेला सातारा शहर पोलिसांनी कोरेगाव येथून अटक केली.
परळी खोऱ्यातील सावली ता. सातारा गावच्या हद्दीत रानडुक्कराची शिकार करून मांस विक्री करणाऱ्या १६ जणांना वनविभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याजवळील मांस जप्त करत वन्यप्राणी शिकार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथील ४ ऑक्टोंबर २०२२ रोजी दुर्गा उत्सवाच्या एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांनी दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याची तक्रार हमीद खान व नुरखान पठाण यांनी कोरेगाव पोलिसात दिली आहे. त्यानुसार विक्रम पावसकर यांच्यावर आयपीसी १५३ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.