maharashtra

पाण्यात बुडून एकाचा मृत्यू


पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 18 ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अविनाश उर्फ पप्पू शिवाजी जगताप वय 27, रा. सटवाई कॉलनी, शिरवळ, ता. खंडाळा हे आपल्या घराकडे मोटरसायकल वरून जात असताना मांड ओढ्याच्या पुलावरून त्यांची दुचाकी स्लीप झाल्याने ओढ्याच्या पाण्यात पडले. पोहोता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची खबर दीपक संपत मगर वय 39, रा. शिरवळ तालुका खंडाळा यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार एम. ए. कुंभार करीत आहेत.