सातारा शहर परिसरातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन दुचाकींची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : सातारा शहर परिसरातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन दुचाकींची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच ते पावणेतीन वाजण्याच्या दरम्यान मल्हार पेठेत पार्क केलेली वीस हजार रुपये किमतीची मोपेड क्रमांक एम एच 11 बी एन 45 18 ही अज्ञात चोरट्याने चोरी केली असल्याची फिर्याद प्रवीण प्रकाश शिंदे वय 42, रा. मल्हार पेठ, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
दुसऱ्या घटनेत दि. 15 ऑक्टोबर रोजी 10 ते 16 ऑक्टोबर च्या पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान शनिवार पेठ, सातारा येथून घरासमोर पार्क केलेली बजरंग शंकर कदम वय 44 यांची हिरो होंडा कंपनीची 35 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.


