maharashtra

एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कार चालकावर गुन्हा


एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कार चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कार चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 6 सप्टेंबर रोजी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दिनेश दत्ताराम टोळे वय 23, रा. रामोशी वाडी, पुणे हा आपल्या ताब्यातील इको गाडी क्रमांक एमएच 12 एचएफ 0824 ही भरधाव वेगाने, निष्काळजीपणे चालवीत कोल्हापूर दिशेकडे निघाला होता. यावेळी समोर चाललेल्या एका ट्रक मध्ये सुरक्षित अंतर न ठेवल्यामुळे ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने ही गाडी ट्रकला जाऊन धडकली. या अपघातात कारमधील भिवा तुकाराम टोळे वय 62 यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दिनेश दत्ताराम टोळे यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जे. बी. कारळे करीत आहेत.