अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 ऑक्टोबर रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा महाविद्यालयात जात असताना पाठलाग करून तसेच तिच्याशी जवळील साधण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अर्जुन साळुंखे रा. नागठाणे ता. सातारा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मोटे करीत आहेत.


