maharashtra

विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा


विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 9 फेब्रुवारी 2022 ते 23 जून 2022 दरम्यान मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी सिद्धी ज्ञानेश्वर भोसले वय 19, रा. फरांदवाडी, ता. फलटण यांनी सासरे भीमराव विठ्ठल भोसले, सासु माया भीमराव भोसले यांच्यावर तसेच पती ज्ञानेश्वर भीमराव भोसले याने माहेरून चार लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत मारहाण केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.