येत्या दि.३० नोव्हेंबर रोजी किल्ले प्रतापगड येथे साजरा होणारा शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरुपात साजरा होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. यंदाच्या शिवप्रतापदिनाचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्याचे सुपूत्र व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते किल्ले प्रतापगडावर भव्य असा जरीकाठी भगवा झेंडा फडकविण्यात येणार आहे.
दोन कंटेनर चालकांमध्ये पत्नीच्या चारित्र्याविषयी बोलण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात शिवानंद पुजारी याने स्वप्निल गीते यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले होते. यामध्ये गीतेचा जागीच मृत्यू झाला होता. शिवानंद जगन्नाथ पुजारी याला शिरवळ पोलिसांनी बारा तासात जेरबंद केले.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशाने जिल्ह्यामध्ये जुगार अड्डयांवर छापा सत्र सुरूच असून पेरले, ता. कराड येथे पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकून सुमारे १ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
अपघातात जखमी झालेल्या महिलेचा कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची नोंद औंध पोलीस ठाण्यात झाली.
कराड तालुक्यात अल्पवयीन मुलीच्या अज्ञान पणाचा फायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून एकाने तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
दुघी, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत रेल्वेने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
मलकापूर, ता. कराड येथून एकजण बेपत्ता झाल्याची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
जिल्ह्यातील किमान तापमानात उतार येत असून महाबळेश्वरचा पारा आणखी घसरला. सोमवारी तर १०.०४ अंशाची नोंद झाली. त्यातच थंडगार वारे वाहत असल्याने जिल्ह्यात हुडहुडी वाढली आहे. तर महाबळेश्वरातील सोमवारचे किमान तापमान यंदाच्या हंगामातील निचांकी ठरले आहे.
बहादुरवाडी ता वाळवा येथील नितीन मानसिंग दळवी वय २७ या युवकासह सहा युवकांना ३० लाखाला फसवणाऱ्या आकाश काशिनाथ डांगे (वय २३ रा. भाडळी बुद्रुक ता. फलटण) या तोतया नौदल अधिकाऱ्यावर शनिवारी रात्री उशिरा आष्टा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
विविध मागण्यांसाठी पुणे बंगळुर ग्रीन फिल्ड हायवे बाधित शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले .