भोसलेवाडी, ता. सातारा येथे एकाकडुन जबरदस्तीने १ हजार २०० रुपये रोख रक्कम काढून घेतल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : भोसलेवाडी, ता. सातारा येथे एकाकडुन जबरदस्तीने १ हजार २०० रुपये रोख रक्कम काढून घेतल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२० नोव्हेंबर रोजी ७.१५ वाजण्याच्या सुमारास भोसलेवाडी गावच्या हद्दीत लक्ष्मी मंदिरासमोर रस्त्यावर अक्षय दत्तात्रय सुतार, रा. आयटीआय रोड, शाहूपुरी, सातारा आणि त्याचा मित्र रवींद्र राजेंद्र पवार हे दोघे हॉटेल गायरान येथे दुचाकीवरून जात असताना राहुल धोत्रे, राजू धोत्रे, रा. मतकर कॉलनी, शाहूपुरी, सातारा यांनी दुचाकीवरून पाठीमागून घेऊन अक्षय दत्तात्रय सुतार याच्या खिशातील १ हजार २०० रुपये रोख रक्कम काढून घेतल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


