बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगून त्याची परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार सदस्यांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून आठ काडतूस, चार पिस्टल, एक मॅक्झिन, तीन मोबाईल, दोन मोटरसायकल असा चार लाख 18 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
फलटण, ता. फलटण येथे रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवल्याने विक्रेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नगरपालिका व अतिक्रमण हटाव विभागाच्या विरोधात आंदोलन केली. यावेळी छोट्या व्यापाऱ्यांच्या नुकसानाला जबाबदार कोण, असा खडा सवाल त्यांनी केला.
मुंबई कृषी समितीच्या शौचालयाबाबत तक्रार करणाऱ्या तक्रारदाराला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली.
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर आणि धर्मरक्षकच आहेत, असे प्रत्युत्तर शनिवारी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिले. तर फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक तर होतेच, शिवाय धर्मवीरही होते, असे म्हणत अजित पवार यांना उत्तर दिले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष गौरव पुरस्कार समितीच्या वतीने देण्यात येणारा सावित्रीबाई फुले संघर्ष गौरव पुरस्कार पंढरपूरचे तरुण कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज बंडगर आणि असंघटित क्षेत्रातील बिडी कामगारांच्या महिला नेत्या शारदाताई गुरु पवार यांना देण्यात येणार आहे.
मांढदरेव येथील श्री काळेश्वरी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. याविषयी तयारीचा आढावा घेण्यासाठी मांढरदेवी येथील एमटीडीसी येथे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
बोंडारवाडी प्रकल्पाचा प्रश्न 2010 पासून भिजत घोंगड्यासारखा पडला आहे. इतक्या वर्षांनी त्यांना लक्षवेधी करण्यासाठी वेळ मिळणे आणि सिंचन विभागाकडूनच हा प्रकल्प व्हावा यासाठी त्यांनी आग्रह धरणे हे तांत्रिकदृष्टया अयोग्य ठरणार आहे.
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अपघातात कारचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
देगाव फाटा येथील एका अपार्टमेंट मध्ये चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.