विषयांच्या अपूर्ण टिपण्या आणि भरमसाठ विषयांची जंत्री करत सातारा पालिकेच्या प्रशासकीय सभेने तब्बल 181 विषयांना शुक्रवारी मंजूरी दिली.
शाहूनगर शाहूपुरी व शहराच्या हद्दवाढीतील नवीन भागात असणाऱ्या वकिलांच्या कार्यालयांना वाणिज्य कर लावू नये, अशी मागणी शाहूनगर येथील एडवोकेट सचिन तिरोडकर यांनी केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी त्यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
तब्बल 2 वर्षानंतर नागपुरला विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले. मात्र, या सरकारने ते 2 आठवड्यात गुंडाळले. लोकायुक्त सुधार विधेयक घाईगडबडीत पारीत केले. अशा प्रकारे विधेयके पारीत करणे महाराष्ट्राला अशोभनीय आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.
सातारा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
पाटण, ता. पाटण येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चार अज्ञात इसमांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
बर्गेवाडी, ता. कोरेगाव येथील राहत्या घरातून एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
अज्ञात दुचाकीने येथील मोती चौक परिसरात महिलेला धडक दिल्याने त्यात ती जखमी झाली.
महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपर चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.