maharashtra

तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन दुचाकींची चोरी


येथील तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : येथील तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२८ ते दि. २९ डिसेंबर २०२२ दरम्यान सातारा येथील गुरुवार पेठमधुन अज्ञात चोरट्याने दुचाकी क्रमांक एम. एच. ११ बी.एम. ०७९० चोरून नेल्याची तक्रार प्रशांत सुभाष पोरे, रा. गुरुवार पेठ, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. दुसऱ्या घटनेत दि. २ जानेवारी रोजी ६.३० वाजण्याच्या सुमारास सातारा येथील उमाशंकर वेदांत विद्यापीठ परिसरातून दुचाकी क्रमांक एम. एच. ११ ए.व्ही. ९५७६ चोरून नेल्याची तक्रार गिरीश केशव वाळिंबे, रा. गुरुवार पेठ, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. तिसऱ्या घटनेत दि. २ जानेवारी रोजी १०.१५ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील सोमवार पेटीतून अज्ञात चोरट्याने दुचाकी क्रमांक एम. एच.११ सीसी ७१९४ चोरून नेण्याची तक्रार इम्रान अहमद बागवान, रा. बुधवार पेठ, सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.