उन्हाळ्यामध्ये वीजेच्या बिलात बरीच वाढ होते. पण काही टीप्स फॉलो करुन त्यापासून दिलासा मिळवू शकता.
उन्हाळा जवळपास सुरु झाला आहे. उन्हाच्या झळा लागत आहेत. लोकांना आतापासूनच घाम फुटू लागला आहे. जिथे हिवाळ्यात वीज बिल कमी येते तिथे उन्हाळ्यात बिल बरेच वाढते. उन्हाळ्यात एसी, फ्रीज, कुलर, वॉशिंग मशिनचा वापर जास्त होतो, त्यामुळे बिलही जास्त येणे स्वाभाविक आहे. ज्याचा परिणाम आपल्या खिशावर होतो. मात्र आवश्यक टिप्स फॉलो केल्यास तुमचे वीज बिल 50 टक्क्यांनी कमी होऊ शकते.
सोलार पॅनेल
भारतात सौर पॅनेल (Solar panel) हा सर्वोत्तम पर्याय आहे. भारतात एका महिन्यात 30 दिवस सूर्यप्रकाश मिळतो. तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल लावू शकता. ही एकवेळची गुंतवणूक आहे, परंतु यामुळे तुमचे वीज बिल कमी होऊ शकते. ऑनलाइन रिसर्च करून तुम्ही ते तुमच्या घरानुसार इन्स्टॉल करू शकता.
LED लाईट
एलईडी लाईट कमी वीज वापरतो आणि चांगला प्रकाश देखील देतो. त्याच वेळी, तुम्ही 5 स्टार रेटिंगसह उर्वरित उपकरणे देखील घेऊ शकता. त्यातही तुमच्या विजेची बचत होईल.
बल्ब आणि ट्यूबलाइटपेक्षा सीएफएल पाचपट विजेची बचत करते, त्यामुळे ट्यूबलाइटऐवजी सीएफएल वापरा. ज्या खोलीत तुम्हाला प्रकाशाची गरज नाही, तो बंद करा. इन्फ्रारेड सेन्सर, मोशन सेन्सर आणि डिमर यासारख्या गोष्टी वापरा.
सीलिंग आणि टेबल फॅन्सचा अधिक वापर
उन्हाळ्यात एसीपेक्षा सीलिंग आणि टेबल फॅनचा जास्त वापर करा. त्याची किंमत 30 पैसे प्रति तास आहे, तर एसी 10 रुपये प्रति तास चालतो. जर तुम्हाला एअर कंडिशन चालवायचे असेल तर 25 डिग्री सेव्ह करून चालवा. यामुळे विजेचा वापरही कमी होईल. तसेच ज्या खोलीत एसी चालू आहे, त्या खोलीचा दरवाजा बंद ठेवा.
फ्रीजवर कुकिंग रेंज ठेवू नका
फ्रीजवर मायक्रोवेव्हसारख्या वस्तू अजिबात ठेवू नका. याचा परिणाम जास्त वीज वापरावर होतो. फ्रीज थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. रेफ्रिजरेटरभोवती हवेच्या प्रवाहासाठी पुरेशी जागा द्या. फ्रीजमध्ये गरम अन्न ठेवू नका. संगणक आणि टीव्ही वापरुन झाल्यानंतर तो पूर्णपणे बंद करा. फोन आणि कॅमेरा चार्जर वापरल्यानंतर, तो प्लगमधून अनप्लग करा. प्लग इन केल्यावर, जास्त वीज वापरली जाते.