जावली तालुक्यातील आज तक व दैनिक पुढारीचे पत्रकार इम्तियाज मुजावर यांना पोस्टाद्वारे पत्र पाठवून धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाला तात्काळ शोधून अटक करावी व कडक कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार संघ जावळीचे अध्यक्ष पदाधिकारी व सदस्यांनी मेढा पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे.
सातारा-फलटण रोडवर वाढे फाटा पासून मद्यधुंद कंटेनर चालकाने रस्त्यावरील वाहने उडवली. कंटेनर न थांबवता सुमारे २ किलोमिटर पर्यंत हा थरार सुरू होता. यामुळे वाहनधारकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत चारचाकी, दुचाकी वाहनांचे नुकसान झाले असून, काहीजण जखमी झाले आहेत.
चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
साबळेवाडी, तालुका सातारा येथील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने बोर्नव्हिटाच्या ऐवजी चुकून ड्रेन वॉश पिल्याने तो अत्यवस्थ झाल्याची घटना समोर आली आहे. साहिल तानाजी पवार राहणार साबळेवाडी असे संबंधित मुलाचे नाव आहे. किराणा मालाच्या दुकानदाराने बोर्नव्हिटा ऐवजी चुकून ड्रेन वॉश दिल्याने अपघाताने हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे..
ऑनलाईन रमी खेळण्यासाठी पैसे उपलब्ध व्हावेत याकरिता सातारा शहर औद्योगिक वसाहतीमध्ये तब्बल 36 बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या आरोपीस सातारा शहर पोलीस ठाण्याने ताब्यात घेतले आहे.
पानवण, ता. माण येथून स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलीस ठाण्यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत 60 किलो गांजा जप्त करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
छ. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत रेनावळे,ता सातारा या गावामध्ये गुरुवार दि.27 जानेवारी ते 2 फेब्रुवारीअखेर सात दिवस विशेष श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
अडचण होत आहे असे समजून वड कापायला निघालेल्या हडपसरच्या एका व्यक्तीकडून आम्ही शंभर वर्ष वयाचा हा वटवृक्ष शास्रोक्त पद्धतीने पुनर्रोपणासाठी हलवला.
सरकार म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र असतो. कोणतेही सरकार 40 लोकांसाठी चालवले जात नाही, तर ते 13 कोटी महाराष्ट्रासाठी चालवलं पाहिजे, हे सत्तेतल्या लोकांनी समजून घ्यावे, असा मार्मिक टोला त्यांनी सध्याच्या शिंदेशाही सरकारला लगावला.
साखर कारखानदारांनी इथेनॉलच्या निर्मितीसाठी आपला पुढाकार घ्यावा यातून निश्चितच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.