चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कूपर बंगला, सदर बाजार येथील पाच हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड चोरी करून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अतिक्रमण मुजास काळे रा. रेवडी फाटा, ता. कोरेगाव याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसोशीने चौकशी केली असता तो चंदन चोरी करण्याकरताच आला असल्याचे समजले. तसेच त्याच्याकडे चंदनाचे झाड तोडण्यासाठी आवश्यक असणारी हत्यारे मिळून आली. अधिक तपास केला असता त्याने यापूर्वी चंदन चोरीचे तीन गुन्हे केल्याबाबत सांगितले असून त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपाधीक्षक मोहन शिंदे, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, महिला पोलीस निरीक्षक श्रीमती वंदना श्रीसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस नाईक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, बापू ठोंबरे, विक्रम माने, संतोष कचरे, गणेश भोंग, सागर गायकवाड, गणेश घाडगे, विशाल धुमाळ यांनी केली आहे.


