साबळेवाडी, तालुका सातारा येथील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने बोर्नव्हिटाच्या ऐवजी चुकून ड्रेन वॉश पिल्याने तो अत्यवस्थ झाल्याची घटना समोर आली आहे. साहिल तानाजी पवार राहणार साबळेवाडी असे संबंधित मुलाचे नाव आहे. किराणा मालाच्या दुकानदाराने बोर्नव्हिटा ऐवजी चुकून ड्रेन वॉश दिल्याने अपघाताने हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे..
सातारा : साबळेवाडी, तालुका सातारा येथील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने बोर्नव्हिटाच्या ऐवजी चुकून ड्रेन वॉश पिल्याने तो अत्यवस्थ झाल्याची घटना समोर आली आहे. साहिल तानाजी पवार राहणार साबळेवाडी असे संबंधित मुलाचे नाव आहे. किराणा मालाच्या दुकानदाराने बोर्नव्हिटा ऐवजी चुकून ड्रेन वॉश दिल्याने अपघाताने हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे..
साहिल याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. साहिलचे वडील तानाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात लग्नकार्य होते. साहिल नुकताच शाळेतून आला होता. साहिल याला बोर्नव्हिटा पिण्याची सवय असल्याने त्यांनी दुकानातून बोर्नव्हिटा आणला. मात्र अनावधानाने बोर्नव्हिटाऐवजी चुकून ड्रेन वॉश त्याच्या खाण्यात आले. त्यामुळे त्याच्या लाळेतून पांढरा फेस गळू लागला.
घाबरलेल्या पालकांनी त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथील वैद्यकीय सूत्रांनी त्याची तपासणी करून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले. संबंधित मुलावर या घटनेला जबाबदार असणाऱ्यांनी खर्च करावा आणि आम्हाला याप्रकरणी न्याय मिळावा, अशी मागणी तानाजी पवार यांनी केली आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.


