सातारा-फलटण रोडवर वाढे फाटा पासून मद्यधुंद कंटेनर चालकाने रस्त्यावरील वाहने उडवली. कंटेनर न थांबवता सुमारे २ किलोमिटर पर्यंत हा थरार सुरू होता. यामुळे वाहनधारकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत चारचाकी, दुचाकी वाहनांचे नुकसान झाले असून, काहीजण जखमी झाले आहेत.
सातारा : सातारा-फलटण रोडवर वाढे फाटा पासून मद्यधुंद कंटेनर चालकाने रस्त्यावरील वाहने उडवली. कंटेनर न थांबवता सुमारे २ किलोमिटर पर्यंत हा थरार सुरू होता. यामुळे वाहनधारकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत चारचाकी, दुचाकी वाहनांचे नुकसान झाले असून, काहीजण जखमी झाले आहेत.
वाहतूक पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कंटेनर चालकाचा थरारकपणे पाठलाग केला. सुमारे १५ किलो मिटर अंतरावर कंटेनर चालकाला महामार्गावर पोलिसांनी पकडले. ही कारवाई ट्रॅफिक पोलीस सुभाष कोळेकर, दादा राजगे यांनी केली.


