महावितरणकडून सध्या सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्वच थकीत वीजबिलापोटीच्या अन्यायकारक वसुलीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नागठाणे (ता. सातारा) येथे बुधवारी वीज वितरण कंपनीविरोधात होणार्या आक्रोश मोर्चास काही कालावधीसाठी स्थगिती देण्यात आली. बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ. सागर वाघ यांनी वीज वितरण कार्यालयाचे अधिकारी व आंदोलनकर्ते यांच्यात बैठक घडवून आणली. विहित कालावधीत विद्युत विभाग शासन दरबारी मागण्या मान्य होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे वीज कनेक्शन तोडणार नाही, असे आश्वासन उपस्थित
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 36 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 177 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
‘राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील काही प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. खबरदारीच्या उपापयोजना म्हणून सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचार बंदी लागू केलेली आहे,’ अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
शिवगान स्पर्धेमुळे, शिवरायांच्या शौर्य, ध्यर्य, पराक्रम, बुद्धिचातुर्य, स्वयंशिस्त आदी गुणांचा प्रसार होऊन ते अंगीकारण्याची जाणीव जागृती झाली आहे. आगामी काळात शिवगान स्पर्धा अधिक व्यापक पद्धतीने आयोजित करण्यात आमचे नेहमीच सहकार्य राहील. तसेच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज एकमेवाद्वितीय राजे होते. त्यांच्या राज्यशैलीचे अनुकरण केल्यास भारत देश महासत्ता बनेल,’ असा आशावाद खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवरायांचा इतिहास उजेडात आणण्याबरोबरच त्यांचा मानवी कल्याणाचा विचार महात्मा जोतिराव फुल्यांनी महाराष्ट्राच्या मातीत रुजवला. रायगडावरील छत्रपतींची समाधी शोधून जगातील पहिली जयंती त्यांनी साजरी केली. शिवरायांवरील पहिला पोवाडाही म. फुल्यांनी लिहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहिताना पत्राची सुरुवात जयशिवराय या शब्दाने करत असत. त्यामुळे छ. शिवराय समजून घ्यायचे असतील तर म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधी वाचले पाहिजेत,’ असे प्रतिपादन साहित्यिक अरुण जावळे यांनी केले.
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 93 बाधितांची नोंद झाली असून, 7 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
‘मध्ययुगीन काळात अनेक सत्तांनी अनियंत्रित राजेशाहींचा अवलंब केला असताना शिवाजी महाराजांनी कल्याणकारी राजेशाहीचा अवलंब केला. शिवकाळातील राजकारण हे समाजहितासाठी होते. जनतेच्या अडचणी सोडविणे त्यांना वेळेत न्याय मिळवून देणे, या गोष्टी महाराज स्वतःचे आद्यकर्तव्य समजत होते. शिवाजी महाराज म्हणजे भविष्याचा वेध घेणारे एक महान असे कर्मयोगी राजे होते. समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ महाराजांनी अंधकारमय समजल्या जाणार्या मध्ययुगातच रोवली ही गोष्ट नक्कीच आजच्या राजकारणाला, सत्तेलाही मार्गदर्शक ठरावी अशीच आहे,’ अ
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 53 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा मृत्यू झाला असून, 41 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
गडकरी आळी येथील जय भवानी विकास मंडळ व शिवगणेश ग्रुपमार्फत शिवजयंतीचे औचित्य साधून कोरोना महामारीच्या या काळामध्ये खर्या अर्थाने ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली अशा कोरोना योद्ध्यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळातील युवकांचे कार्य आदर्शवत असल्याचे सपोनि विशाल वायकर यांनी सांगितले.
गेल्या कित्येक दिवसांपासून सातार्यातील वरच्या रस्त्यावर वाहनचालकांना अडथळा ठरणारी व्हॉल्व्हवर बसवलेली लोखंडी जाळी नगरपालिका प्रशासनाने हटवली आहे. त्याखालील जलवाहिनीच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती झाल्यानंतर त्याठिकाणी पुन्हा जाळी न बसविता तेथे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.