जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 70 बाधितांची नोंद झाली असून, 33 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
कास धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम जोरात सुरू आहे. या धरणाचा सांडवा बांधण्यासाठी कास, धावली, जुंगटी, बामणोली, तेटलीकडे जाणारी वाहतूक तीन महिन्यांसाठी बंद करून ती अंधारी कोरघळ एकीवमार्गे वळवण्याच्या हालचाली संबंधित विभागाच्या सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, तसे झाल्यास स्थानिकांना वेळेसह 20 किमीचे अंतर वाढत असल्याने मोठा भुर्दंड सोसावा लागणार असल्याने या निर्यणाविरोधात कास, धावली, बामणोली, तेटली विभागातील नागरिकांतून जनक्षोभ उसळू लागला असून कास धरणाशेजारूनच तत्काळ पर्यायी रस
सर्वांचेच लक्ष वेधून घेणारा ऐतिहासिक किल्ले वासोटा पाहण्यासाठी बहुसंख्य पर्यटक व गिरीप्रेमी पर्यटनास येत असून, काही बालमावळ्यांचा उत्साह देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. दरम्यान, सातार्यातील हेरंब चव्हाण या पाच वर्षाच्या चिमुकल्याने मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज की जय, या घोषणेच्या स्फुरणाच्या बळावर किल्ले वासोटा पूर्णपणे यशस्वीरीत्या सर केल्याने त्याचे गिरीप्रेमींकडून विशेष कौतुक होत आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुभाव या तत्त्वांवर उभे होते आणि म्हणूनच जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी शिवइतिहास कोरला गेला,’ असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 74 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा मृत्यू झाला तर 101 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
दि. 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह अभियाना’ची भुईंज येथील महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने ‘सायकल रॅली’ने सांगता करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी दै. ‘मुक्तागिरी’शी बोलताना दिली.
सातारा जिल्ह्यात महावितरण कंपनीने शेतकर्यांकडून अन्यायकारक वीजबिल वसुली चालू केली आहे. ती तातडीने थांबवून हुकूमशाही पद्धतीने सुरू असलेली घरगुती तथा शेती पंपाची वीज तोडणी तातडीने थांबवावी, अन्यथा आक्रोश आंदोलन तसेच रास्ता आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
‘राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे,’ असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 94 बाधितांची नोंद झाली असून, तीन बाधितांचा मृत्यू झाला तर 67 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 88 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा मृत्यू झाला तर 49 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.