Satara

esahas.com

विजयकुमार बाचल ‘गोल्डन टीचर अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानिन

येथील प्राथमिक शिक्षक विजयकुमार मोहनराव बाचल यांना चेन्नई येथील कलाम फाउंडेशनतर्फे दिला जाणारा इंटरनॅशनल गोल्डन टीचर अ‍ॅवॉर्ड  प्रदान करण्यात आला. चेन्नईत आयोजित कार्यक्रमात न्यायमूर्ती गणेशकुमारन, सिनेअभिनेते विजयकुमारन आदींच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान कार्यक्रम झाला. 

esahas.com

महिला महाविद्यालयात आज प्रा. श्रीधर साळुंखे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

मराठी राजभाषा दिन व थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने दि. 27 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी दहा वाजता सुप्रसिद्ध वक्ते व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. श्रीधर साळुंखे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती मराठी विभागप्रमुख प्रा. घनश्याम गिरी यांनी दिली.

esahas.com

मराठी राजभाषा दिनानिमित्त सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात आज ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

मराठी राजभाषा दिन व थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने दि. 27 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी दहा वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रंथालय शास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. आशा जिरगे यांनी दिली. 

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 130 कोरोनाबाधित

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 130 बाधितांची नोंद झाली असून, 59 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 111 कोरोनाबाधित

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 111 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 35 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

व्यापार्‍यांचा शुक्रवारी जीएसटी विरोधात सातारा जिल्ह्यात बंद 

जीएसटी ऑनलाईन व्यवसाय यांच्या नियमांच्या अन्यायकारक अटींमुळे होणार्‍या त्रासाविरोधात शुक्रवार, दि. 26 रोजी त्यांचे शिखर संघटना कॉन्फेडेरेशन ऑफ ऑल इंडिया (उअखढ) यांनी पुकारलेल्या भारत बंदला सातारा जिल्ह्यात पाठिंबा देण्याचा निर्णय सातारा जिल्हा व्यापारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी घेतला आहे 

esahas.com

स्नेह आपुलकीची भावना तेथेच खरा जिव्हाळा

‘स्नेह आपुलकीची भावना तेथेच खर्‍या अर्थाने जिव्हाळाचे नाते समृद्ध होते,’ असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले.

esahas.com

विद्यार्थ्यांनी शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा

‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. समाजाच्या सर्व घटकातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाने विविध शिष्यवृत्ती योजना राबवलेल्या असून, त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 201 कोरोनाबाधित

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 201बाधितांची नोंद झाली असून, 96 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

कोरोनाच्या विळख्यामुळे दहिवडी शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

सातारा : दहिवडी शहरामध्ये कोरोना बाधित रुग्ण जास्त प्रमाणात आढळल्याने या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता मौजे दहिवडी ता. माण येथील संपूर्ण दहिवडी शहर व त्यामधील वाड्या वस्त्या हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून उपविभागीय अधिकारी माण-खटाव तथा इन्सिडंट कमांडर शैलेश सुर्यवंशी यांनी 22 फेब्रुवारीच्या रात्री 00.00 पासुन पुढील आदेश हाईपर्यंत घोषित केले ...