Satara

esahas.com

हनीट्रॅप करून लुटमार करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपद्वारे ओळख वाढवून भेटायला बोलवण्याच्या बहाण्याने हनीट्रॅपमध्ये अडकवून लुटमार करणार्‍या टोळीचा सातारा तालुका पोलिसांच्या डी. बी. पथकाने पर्दाफाश केला आहे.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 177 कोरोनाबाधित

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 177 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 17 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

भाषा विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी अनुवाद क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी

‘अनुवादक हे वेगाने विस्तारणारे करिअर आहे. ज्या विद्यार्थ्यांचे भाषेवर प्रभुत्व आहे आणि ज्यांना करिअरच्या वेगळ्या वाटेवर जायचे असेल त्यांनी ‘अनुवाद’ या क्षेत्राचा नक्कीच विचार करावा. त्यात अर्थार्जन तर होईलच; परंतु वेगवेगळ्या विभाग, प्रदेश, देशांचा सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक असा अभ्यासही त्यातून करता येईल,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी केले.

esahas.com

परळीत पशुचिकित्सा शिबिरास पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती सातारा आणि पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 परळी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी येथे दि. 26 फेब्रुवारी रोजी पशुचिकित्सा शिबिर पार पडले.

esahas.com

पीडितांसाठी खर्‍या अर्थाने विश्‍वासपात्र ‘भरोसा सेल’

प्रेम, विश्‍वास, आदर, काळजी, आपुलकीच्या आधारावर सुखी संसार सुरू असतानाच एखादे वादळ येऊन संसाराची गाडी भरकटते. इगो, संशय, मत्सर, अविश्‍वास अशा अनेक कारणांनी संसारामध्ये भांडणे लागतात. ही भांडणे चार भिंतीत न राहता अनेकदा संसार मोडण्याची वेळ येते. अशावेळी दोन्ही बाजू समजून घेऊन समझोता करणार्‍या हक्काच्या आणि विश्‍वासू संस्थेची गरज असते. पोलीस दलाच्या ‘भरोसा सेल’ने आपले नाव सार्थ करून दाखवत गेल्या वर्षभरात 46 व यावर्षीच्या 9 अशा 55 जणांचा संसाराची गाडी पुन्हा रुळावर आणली आहे. 

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 117 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 117 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 98 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

सज्जनगडावर उदवर्चनाने दासनवमी महोत्सवास प्रारंभ

सज्जनगडावरील दासनवमी महोत्सवास  शनिवार (दि. 27) पासून सुरुवात झाली  असून, यात्रेचा मुख्य दिवस दासनवमी ही सात मार्चला होत आहे. यंदाचा दासनवमी महोत्सव कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा होणार आहे, अशी माहिती ‘समर्थ रामदास स्वामी संस्थान’चे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी व समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी यांनी दिली.

esahas.com

अखिल सातारा शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संजीवन जगदाळे

अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा  कोंडवे (सातारा)  येथे  पार पडली. या सभेत जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत नूतन जिल्हाध्यक्षपदी संजीवन रामचंद्र जगदाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 176 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 176 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 136 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे

केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा राज्य यांच्यावतीने कोव्हिड -19 लसीकरण तसेच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. शुक्रवार दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी सातारा जिल्ह्यात बहुमाध्यम जनजागृती अभियानाची सुरुवात येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या समोर करण्यात आली.