जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 129 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 38 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणू संशयित अथवा संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी लग्न समारंभाबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत.
महामार्ग पोलीस केंद्र, भुईंज मार्फत महाराष्ट्र राज्याचे वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून व पोलीस अधीक्षक संजय जाधव, पोलीस उपअधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस निरीक्षक राजन सस्ते महामार्ग पोलीस विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हायवे मृत्युंजय दूत अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ महामार्ग पोलीस केंद्र, भुईंज यांच्या मार्फत जोशीविहीर (ता. वाई) येथील साईविश्व मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.
‘मराठी भाषेचे आपल्यावर अनंत उपकार असून, या भाषेमुळेच अकरा कोटी मराठी जनतेला जीवनाचा आनंद घेता येत आहे, हजारो वर्षांपासून मराठी भाषेने आपली ज्ञान परंपरा जपली आहे. या भाषेचा गौरव, रक्षण व जतन करणे, हे आपले परम कर्तव्य आहे,’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते व साहित्यिक प्रा. श्रीधर साळुंखे यांनी केले.
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 156 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 81 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
‘आपला देश कृषिप्रधान देश आहे. मात्र नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट आदी समस्यांमुळे शेतीमध्ये अनंत अडचणी येत असतात. शेतकरी आर्थिक सक्षम राहण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय हा एकमेव पर्याय आहे. मधुमक्षिका पालन हा फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय असून, त्यासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य केले जात आहे. त्यामुळे शेतकर्यांनी या व्यवसायातून आपली आर्थिक उन्नती साधावी,’ असे आवाहन वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
‘सातारा जिल्ह्यातील तारळे येथील कवी यशवंत हे थोर कवी होते. त्यांच्या लेखनामध्ये विविधता होती. त्यांनी विपुल प्रमाणात आणि दीर्घ लेखन केले. त्यांना विविध पुरस्कार आणि सन्मान मिळाले. त्यांच्या लेखनामध्ये कमालीची विविधता होती. कथा, कविता, जातपत कविता, विडंबन कविता, बालकविता, प्रासंगिक, कथात्मक, अनुवाद, व्यासपीठ कविता असे त्यांच्या लेखनाचे वैविध्य होते. नवीन पिढीला त्यांच्या लेखनाबद्दल माहिती व्हावी, यासाठी त्यांच्या लेखनावर समीक्षा होणे गरजेचे आहे,’ असे मत शिवाजी विद्यापीठच्या मराठी अधिविभागाचे प्रम
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 125 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 75 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांना नगरपरिषदेने हद्दवाढ क्षेत्राचा 51 कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर केला असून, याबाबत आम्ही मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली आहे. ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या अभिवचनाप्रमाणे लवकरच सातारा नगरपरिषदेकडे याकामी निधी प्राप्त होईल,’ अशी माहिती खा. उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
जावली तालुक्यातील 54 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागणे अत्यावश्यक आहे. हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी सोमवारी जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागाची महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीत ना. पवार यांनी बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव येत्या महिनाभरात तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांना केल्या. दरम्यान, प्रस्ताव त