Satara

esahas.com

कराड तालुक्यातील गावांसाठी सामाजिक विकास योजनेतून निधी द्या

कराड तालुक्यातील गावांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास निधी योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयामार्फत राबवणाऱ्या येणाऱ्या योजनेमध्ये तालुक्यातील ५ हजार लोकसंख्येच्या वरच्या गावांना केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून गावच्या विकासासाठी हातभार लावावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली आहे.

esahas.com

गजानन हाऊसिंग सोसायटीत विविध विकासकामांचे भूमिपूजन

गजानन हाऊसिंग सोसायटी (कराड) येथे जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्या माध्यमातून व प्रयत्नातुन  मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.

esahas.com

रोटरीतर्फे जागतिक पोलिओ दिनानिमित्त जनजागृती रॅली

पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रोटरी इंटरनॅशनलने भरीव कामगिरी केली आहे. याविषयी समाजात अजूनही जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी जागतिक पोलिओ दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कराड, इनरव्हील क्लब ऑफ कराड, संगम व रोट्रॅक्ट क्लब ऑफ कराड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने कार जनजागृती रॅली काढण्यात आली.

esahas.com

शासकिय नोकरावरील हल्ल्यातील आरोपी हर्षल चिकणे याला ४ तासाचे आत अटक करुन कारवाई

"निर्भया पोलीस चौकी” यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा येथे फिर्यादी पो.कॉ. सुहास जगन्नाथ कदम ब.नं. ३०२ हे कर्तव्यावर हजर असताना, सायन्स कॉलेजचा विद्यार्थी जयराज धनंजय जाधव रा. काशिळ ता. कराड जि. सातारा हा आला व त्यास तीन मुलांनी मारहाण केल्याची तक्रार दिल्याने पो. कॉ. सुहास कदम यांनी त्यातील एकाच्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन त्यास निर्भया पोलीस चौकी येथे येण्यास सांगितले असता, आरोपीने निर्भया पोलीस चौकीमध्ये येवून फिर्यादीस आरेरावीची भाषा वापरुन फिर्यादीच्या वर्दीची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याने

esahas.com

वानखेडेंची नोकरी जातेय की मलिक यांचे मंत्रीपद जातंय, ते पाहुया : रामदास आठवले

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची एक वर्षात नोकरी घालवणार असं विधान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं होतं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. वानखेडेंची नोकरी जाते की नवाब मलिक यांचं मंत्रिपद जातं है पाहुया, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.

esahas.com

सैदापुर येथे बेशुद्ध पडून एकाचा मृत्यू

सैदापुर, ता. सातारा येथे राहत्या घरासमोर बेशुद्ध पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

esahas.com

सातारा येथे जुगार अड्डयावर छापा

येथील जुना मोटर स्टँड परिसरात जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी १ हजार ४४४ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.

esahas.com

ट्रॅक्टरचा टायर फुटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

ट्रॅक्टरचे काम करीत असताना टायर फुटून डिस्क चेहऱ्यावर लागून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.

esahas.com

अपघातात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

खिंडवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत  ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.

esahas.com

आंतरराज्य मोटार सायकल चोरट्यास अटक

आंतरराज्य मोटार सायकल चोरट्याला ताब्यात घेण्यात कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. त्याच्याकडून चोरीच्या 16 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.