ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरे द्यावीत, अन्यथा जनतेचीव शेतकऱ्याची फसवणूक केल्या प्रकरणी सपशेल माफी मागावी
सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचे मी नाही... मी नाही... करणाऱ्यांनी अतोनात नुकसान केले. शून्य आकारात स्टेडियम बांधले की व्यापारी संकुल, ज्यांनी हे पाप केले अशा तत्कालीन लोकप्रतिनिधिच्या व पालकमंत्री यांच्या कानफाटात लावली पाहिजे, असे खळबळजनक वक्तव्य भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
आजच्या धावपळीच्या जगात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला असताना, सातारा बस स्थानकावर ओप्पो कंपनीचा सापडलेला मोबाईल सातारा पोलीस यांच्याकडे जमा करून पत्रकार विशाल सूर्यवंशी यांनी आपल्या कृतीतून प्रामाणिकपणा दाखवून दिला.
युवकांनी उद्योजक बनले पाहिजे. युवकांनी स्वतः मधल्या क्षमता ओळखून व्यवसायाची सुरवात करावी, असे प्रतिपादन भारतीय युवा ट्रस्ट संस्था सातारा जिल्हा क्लस्टर अधिकारी रोशन अहिरे यांनी केले.
साताऱ्यात चार भिंती शिवसेना जिल्हा कार्यकारीणीच्या वतीने कंदिल आंदोलन करण्यात आले. या परिसरात पथदिवे लावून हा परिसर प्रकाशमान करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सातारा तालुक्यातील सोनगाव तर्फ सातारा येथील युवक मयूर बाळासो मुळीक (वय २९) याने गळफास घेवून आत्महत्या केली. याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
फलटण शहर पोलीसांनी बेकायदेशीर अंमली पदार्थ गांजावर धडक कारवाई केली आहे. यामध्ये सुमारे 2 किलो 592 ग्रॅम वजनाचा 20 हजार 800 रुपयांचा माल जप्त केला आहे.
सदरबाझार येथील समाज कल्याण ऑफिससमोरील पुलावर एका अज्ञात व्यक्तीने बेशुद्ध होण्याचे सोंग घेत दुचाकीवरून येणाऱ्या फिर्यादीला पकडले. त्यानंतर त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने फिर्यादीला बाजुला असणाऱ्या झाडीत नेवून शस्त्राचा धाक दाखवत लुटले.
मार्निंग वॉकला निघालेल्या दोघांना अज्ञात चारचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली असून अनिल दरेकर असे जागीच ठार झालेल्याचे नाव आहे.
नेरुळ मुंबई येथून खाजगी इर्टीगा गाडीत बसलेल्या प्रवाशानी पुण्यात आल्यानंतर वडील मयत झाल्याचा बहाणा करून, इर्टीगा गाडीला शिरवळ च्या पुढे आणली व गाडी बाजूला घेऊन चकूचा धाक दाखवला व इर्टीगा गाडी पळवून नेऊन जबरी चोरी केली.