maharashtra

विशाल सूर्यवंशी यांचा प्रामाणिकपणा


Honesty of Vishal Suryavanshi
आजच्या धावपळीच्या जगात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला असताना, सातारा बस स्थानकावर ओप्पो कंपनीचा सापडलेला मोबाईल सातारा पोलीस यांच्याकडे जमा करून पत्रकार विशाल सूर्यवंशी यांनी आपल्या कृतीतून प्रामाणिकपणा दाखवून दिला.

पुसेगाव : आजच्या धावपळीच्या जगात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला असताना, सातारा बस स्थानकावर ओप्पो कंपनीचा सापडलेला मोबाईल सातारा पोलीस यांच्याकडे जमा करून पत्रकार विशाल सूर्यवंशी यांनी आपल्या कृतीतून प्रामाणिकपणा दाखवून दिला.
सातारा वरून कोल्हापूरला निघालेल्या पत्रकार विशाल सूर्यवंशी यांना बस स्थानकावरील फलाट क्रमांक. १४ याठिकाणी ओप्पो कंपनीचा स्मार्ट फोन सापडला. आजूबाजूला चौकशी केली असता, सदर मोबाईल मालक दिसला नाही. यावेळी सातारा बस स्थानकामधील पोलीस चौकीतील पोलीस अधिकारी अजयराज देशमुख यांच्याकडे पत्रकार विशाल सूर्यवंशी यांनी मोबाईल जमा केला.
त्यानंतर दोन तासानंतर मोबाईल मालक प्रकाश फडतरे यांनी सातारा बस स्थानकावरील पोलीस चौकी येथे जाऊन आपला मोबाईल ताब्यात घेतला. प्रामाणिकपणे मोबाईल दिल्याबद्दल पत्रकार विशाल सूर्यवंशी यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी पोलीस कर्मचारी अजयराज देशमुख म्हणाले, आज प्रामाणिकपणा जिवंत आहे याचे समाधान वाटत आहे. अनेक जण मोबाईल हरवला, पाकीट हरवले म्हणून तक्रारी करत असतात. पण मोजकेच लोक सापडलेल्या वस्तू प्रामाणिकपणे या ठिकाणी जमा करतात पत्रकार विशाल सूर्यवंशी यांनी मनाचा मोठेपणा दाखवून सदर मोबाईल जमा केला. याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि त्यांचे मनापासून आभार.