maharashtra

गळफास घेवून युवकाची आत्महत्या


Youth commits suicide by strangulation
सातारा तालुक्यातील सोनगाव तर्फ सातारा येथील युवक मयूर बाळासो मुळीक (वय २९) याने गळफास घेवून आत्महत्या केली. याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

सातारा : सातारा तालुक्यातील सोनगाव तर्फ सातारा येथील युवक मयूर बाळासो मुळीक (वय २९) याने गळफास घेवून आत्महत्या केली. याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मयूरने शिप्याची पटी नावाच्या शेतातील बांधावरच्या लिंबाच्या झाडाला खडकीच्या कापडी पडद्याने गळफास घेतला. त्याला तत्काळ सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीतून देण्यात आली.