Satara

esahas.com

फलटण येथे सापडले बेवारस अवस्थेतील स्त्री जातीचे नवजात अर्भक

शहरातील शिवाजी नगर, येथे एका छोट्या खड्ड्यात नवजात स्त्री जातीचे अर्भक सापडले आहे. त्याच्यावर सातारा सिव्हिल येथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती उत्तम आहे. याबाबत अज्ञात इसमावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

चहाची टपरी फोडून साहित्य चोरीस

अज्ञात चोरट्याने कर्मवीर नगर येथे बंद असलेली चहाची टपरी फोडून त्यातून 1200 रुपये किंमतीचे साहित्य व चिल्लर चोरुन नेली.

esahas.com

दुकानाचे लॉक तोडून 17 हजार 500 रुपये किंमतीचे साहित्य चोरीस

शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात चोरट्याने दुकानाचे लॉक तोडून दुकानातून 17 हजार 500 रुपये किंमतीचे पितळी साहित्य चोरुन नेले.

esahas.com

हलगर्जीपणा कराल तर कारवाई करू !

सहा-सहा वर्ष एका पोलीस ठाण्यात कर्मचारी ठेवण्याचे कारण काय? महिना झाला गुन्हा दाखल होऊन तरी तुम्हांला गुंड सापडत नाही. काय काम करता तुम्ही आणि तुमचे कर्मचारी? असा प्रश्न गृहराज्‍यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी उपस्थित करुन नगरसेवक विनोद (बाळू) खंदारे याच्या तपासात हलगर्जीपणा केल्याने तुमच्यावर कारवाई करु, असा जणू इशाराच दिला आहे.

esahas.com

सहकारमंत्री आहात की, सह्याद्रीचे चेअरमन हे स्पष्ट करा!

सहकारमंत्र्यांनी तीन तुकड्यात एफआरपी देण्याचे जाहीर केले. परंतु, स्व. यशवंतराव चव्हाण, पी.डी पाटील साहेबांचा वारसा सांगणाऱ्या सहकारमंत्र्यांनी सहकाराची भूमिका घ्यायला हवी. मात्र, तेच भक्षकासारखे वागत असून त्यांनी आपण सहकारमंत्री आहोत; की सह्याद्रीचे चेअरमन हे आधी स्पष्ट करावे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर शरसंधान साधले.

esahas.com

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत एसटी जळून खाक; सुदैवाने जीवित हानी नाही

कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी गाडीला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यामुळे यामध्ये संपूर्ण गाडी जळून खाक झाली. ही घटना पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यानजीक रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. यामध्ये कसलीही  सुदेवाने जीवित हानी झाली नाही.

esahas.com

जिल्हा बँकेत मकरंद पाटील, राजेंद्र राजपुरे व शिवरूप राजे बिनविरोध

सातारा जिल्हा बँकेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीन जागा बिनविरोध झाल्या. यामध्ये खरेदी विक्री संघातून आ. मकरंद पाटील आणि महाबळेश्वर विकास सेवा सोसायटी मतदार संघातून राजेंद्र राजपुरे, आणि कृषी प्रक्रिया मतदार संघातून शिवरूप राजे खर्डेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.

esahas.com

महामार्गाखालील भराव काढून कमानी करा, रस्त्यांची उंची वाढवा

भविष्यात महामार्गावर पुराचे पाणी येणार नाही, याची दक्षता घ्या. राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण, सर्व्हिस रोड व उड्डाणपुलांची कामे करताना नदीच्या पाण्याला अडथळा न येता पाणी वाहते राहण्यासाठी भराव काढून कमानी करा व रस्त्यांची उंची वाढवा, अशा सूचना कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, खासदार व लोकप्रतिनिधींनी केल्या.

esahas.com

एकास चौघांजणांनी केली मारहाण

येथील एका महाविद्यालयात मुलीवरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन वर्ये येथील एकास चौघांजणांनी मारहाण केली. यश लोखंडे असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्या डोक्यात वीट घालून त्याला जखमी करण्याबरोबरच त्याच्या पाठीत आणि डोक्यावर दगड फेकून मारले आहेत. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रथमेश जगताप याच्यासह चौघांवर गुन्हा झाला असून यापैकी तिघांची नावे पोलिसांना समजू शकलेली नाहीत.

esahas.com

पाटण तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का

पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात रविवारी 24 रोजी सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी सौम्य भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल असल्याची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली.