maharashtra

एकास चौघांजणांनी केली मारहाण


One was beaten by four people
येथील एका महाविद्यालयात मुलीवरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन वर्ये येथील एकास चौघांजणांनी मारहाण केली. यश लोखंडे असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्या डोक्यात वीट घालून त्याला जखमी करण्याबरोबरच त्याच्या पाठीत आणि डोक्यावर दगड फेकून मारले आहेत. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रथमेश जगताप याच्यासह चौघांवर गुन्हा झाला असून यापैकी तिघांची नावे पोलिसांना समजू शकलेली नाहीत.

सातारा : येथील एका महाविद्यालयात मुलीवरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन वर्ये येथील एकास चौघांजणांनी मारहाण केली. यश लोखंडे असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्या डोक्यात वीट घालून त्याला जखमी करण्याबरोबरच त्याच्या पाठीत आणि डोक्यावर दगड फेकून मारले आहेत. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रथमेश जगताप याच्यासह चौघांवर गुन्हा झाला असून यापैकी तिघांची नावे पोलिसांना समजू शकलेली नाहीत.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, यश संतोष लोखंडे (वय १९, रा. वर्ये, ता. सातारा) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, यश याचा भाऊ श्रेयश ज्या कॉलेजमध्ये शिकत आहे त्या कॉलेजमध्ये मुलीवरुन भांडणे झाली आहेत. दरम्यान, शनिवार, दि. २३ रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास यश हा सातारा येथील भूविकास बँक चौकात उभा होता. याचवेळी संशयित प्रथमेश जगताप (रा. वर्ये, ता. सातारा) हा तेथे आला आणि त्यांनी खाली पडलेली वीट उचलून यश याच्या डोक्यात मारुन त्याला जखमी केले. यावेळी त्याला दमदाटी करत धमकावले. 'तुझा भाऊ श्रेयस याची ज्या मुलीमुळे भांडणे झाली तिथल्याच मुलांनी मला तुला मारायला पाठवले आहे. परत जर तू आमच्या नादाला लागलास तर तुला मी जीवंत सोडणार नाही,' असे म्हणून धमकावले. यावेळी संशयित प्रथमेश जगताप याच्याबरोबर असणाऱ्या मित्रांनी यश याला लाथाबुक्क्या आणि हाताने मारहाण करत त्याच्या पाठीवर, डोक्यावर दगड फेकून मारले आहेत.
याप्रकरणी यश याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानतंर प्रथमेश जगताप आणि त्याच्या तीन अनोळखी मित्रांवर गुन्हा दाखल झाला आहे.