maharashtra

फलटण येथे सापडले बेवारस अवस्थेतील स्त्री जातीचे नवजात अर्भक


Neonatal female infants found at Phaltan
शहरातील शिवाजी नगर, येथे एका छोट्या खड्ड्यात नवजात स्त्री जातीचे अर्भक सापडले आहे. त्याच्यावर सातारा सिव्हिल येथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती उत्तम आहे. याबाबत अज्ञात इसमावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण : शहरातील शिवाजी नगर, येथे एका छोट्या खड्ड्यात नवजात स्त्री जातीचे अर्भक सापडले आहे. त्याच्यावर सातारा सिव्हिल येथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती उत्तम आहे. याबाबत अज्ञात इसमावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अशी, सोमवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सकाळी सफाई कामगार कॉलनी, शिवाजी नगर फलटण येथे, मुकेश अहिवळे यांच्या घराच्या पाठीमागील भिंतीस, अर्धा फुट लागुन, अंदाजे 3 फुटाच्या बोळीत, मातीमध्ये पडलेल्या छोट्या खड्ड्यामध्ये, नवजात स्त्री जातीचे अर्भक सापडले आहे. कोणीतरी अज्ञात इसमाने हे नवजात अर्भक तिचे पालन पोषण व देखभाल न करता, तिचा पूर्णतः परीत्याग करुन तिच्या जिवीतास धोका निर्माण होईल हे माहीत असुनही त्या अर्भकास उघड्यावर टाकुन निघुन गेले आहे. या बाबतीत अज्ञात व्यक्तीवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.