Satara

esahas.com

कराड तालुक्यातील विकासकामांसाठी 2 कोटी 79 लाख मंजूर

खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यातील विविध विकासकांमासाठी 2 कोटी 79 लाख रूपायांचा निधी मंजूर झाला आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, 5054, 3054, इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजना तसेच ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ अशा योजनेतून मंजूर झालेल्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी उपलब्ध झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

esahas.com

साताऱ्यात तांदूळ आळी येथे वृध्देला मारहाण

सातार्‍यातील तांदूळ आळी येथे बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून वृध्द महिलेला बेदम मारहाण करत चोरी केली. प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी घरातून देवतांच्या मुर्ती चोरी केल्या आहेत. दरम्यान, वृध्द महिला मारहाणीत बेशुध्द पडल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

esahas.com

ग्रेड सेपरेटरमध्ये झाली कार पलटी

सातारच्या ग्रेड सेपरेटरमध्ये बुधवारी रात्री कार पलटी झाली. भरधाव वेगात कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघातात कारची चारही चाके वर झाली होती. अपघातानंतर कार चालकाने क्रेन बोलावून कार ताब्यात घेतली. दरम्यान, अपघातानंतर पीसीआर व्हॅन देखील घटनास्थळी गेली होती.

esahas.com

पत्नीला पेटवून देवून तिचा खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेप

लग्न झाल्यानंतर दुसर्‍याच वर्षी पत्नीला पेटवून देवून तिचा खून केल्याप्रकरणी राजेश उर्फ राजू गणपत शिंदे (वय 30, रा.खांबील पोकळे ता.महाबळेश्वर) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मंगला धोटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, ही घटना 2017 मध्ये घडलेली आहे.

esahas.com

मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांविरोधात गुन्हा

सातारा शहरात मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून या गुन्ह्यांमध्ये चारजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

जिल्हा न्यायालयातही चोरट्याने साधला डाव; वकिलाच्या कोटासह 34 हजारांची चोरी

जिल्हा न्यायालयातील ग्रंथालयातील महिला कक्षातून अज्ञात चोरट्याने महिला वकिलाचा कोट चोरला. या कोटामध्ये रोख 34 हजार रुपये, दोन पेन, चष्मा बॉक्स असा मुद्देमाल होता.

esahas.com

स्वेटर विक्रेत्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकास अटक

सातार्‍यात स्वेटर विक्रेत्याकडून खरेदी केल्यानंतर पेटीएम कोडद्वारे पैसे पाठवल्याचे नाटक करुन पैसे न देताच फसवणूक करणार्‍या ठगाला सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) विभागाने अटक केली. पोलिस संशयिताकडे असणार्‍या ऍपची माहिती घेत आहेत. दरम्यान, चौकशीमध्ये संशयिताने सातार्‍यातील सुमारे 4 व्यवसायिकांना फसवल्याचे समोर आले आहे.

esahas.com

नगरपालिकांच्या कच्च्या प्रारूप आराखड्यावर 8 डिसेंबरला चर्चा

जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने 30 नोव्हेंबरपर्यंत दोन सदस्यीय प्रभागानुसार प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, 8 डिसेंबरला कच्च्या प्रारूपासह संबंधित नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱयांनी राज्य निवडणूक आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

esahas.com

सहा नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये रिपाई साठी सर्व पर्याय खुले

सातारा जिल्ह्यात सहा नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बहुजनांच्या हक्कासाठी तयारीने उतरणार आहे. जिल्हयातील राष्ट्रीय पक्ष संलग्नित आघाडीशी युती अथवा स्वतंत्र पॅनेल, असे दोन्ही पर्याय रिपाई समोर उपलब्ध आहेत. सहा नगरपंचायतीच्या 102 जागांपैकी किमान 50 जागा ताकतीने लढविणार असल्याची माहिती रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com

पावसाने जिल्ह्यात 35 शेळ्या व मेंढ्या थंडीने गारठून जागीच ठार

जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने व थंडीने खटाव व वाई परिसरातील सुमारे 35 शेळ्या-मेंढ्या गारठून ठार झाल्या आहेत. तसेच 10 अत्यवस्थ असून या पशुपालकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.