maharashtra

नगरपालिकांच्या कच्च्या प्रारूप आराखड्यावर 8 डिसेंबरला चर्चा

राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

Discussion on December 8 on the municipal draft
जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने 30 नोव्हेंबरपर्यंत दोन सदस्यीय प्रभागानुसार प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, 8 डिसेंबरला कच्च्या प्रारूपासह संबंधित नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱयांनी राज्य निवडणूक आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

कराड : जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने 30 नोव्हेंबरपर्यंत दोन सदस्यीय प्रभागानुसार प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, 8 डिसेंबरला कच्च्या प्रारूपासह संबंधित नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱयांनी राज्य निवडणूक आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
राज्यातील 113 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयात मोठय़ा प्रमाणात याचिका दाखल झालेल्या आहेत. प्रभाग रचना योग्य पद्धतीने केलेली नसल्यास उच्च न्यायालयात बाजू मांडणे कठीण जात आहे.
त्यामुळे नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा उपस्थित होऊ नये, यासाठी राज्य निवडणूक आयोग प्रत्येक पालिकेच्या प्रभाग रचनेची तपासणी करणार आहे. त्यासाठी निवडणुका लागलेल्या सर्व नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱयांना 8 डिसेंबरला कच्च्या प्रारूप आराखडय़ासह निवडणूक आयोगासमोर उपस्थित राहण्याचे आदेश आज देण्यात आले आहेत.