maharashtra

पत्नीला पेटवून देवून तिचा खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेप


A man has been sentenced to life imprisonment for killing his wife by setting her on fire
लग्न झाल्यानंतर दुसर्‍याच वर्षी पत्नीला पेटवून देवून तिचा खून केल्याप्रकरणी राजेश उर्फ राजू गणपत शिंदे (वय 30, रा.खांबील पोकळे ता.महाबळेश्वर) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मंगला धोटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, ही घटना 2017 मध्ये घडलेली आहे.

सातारा : लग्न झाल्यानंतर दुसर्‍याच वर्षी पत्नीला पेटवून देवून तिचा खून केल्याप्रकरणी राजेश उर्फ राजू गणपत शिंदे (वय 30, रा.खांबील पोकळे ता.महाबळेश्वर) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मंगला धोटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, ही घटना 2017 मध्ये घडलेली आहे.
सौ.सुनिता राजू शिंदे (वय 28) असे खून झालेल्या विवहितेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राजू शिंदे व सुनिता शिंदे यांचा विवाह झाल्यानंतर राजू पत्नीला वारंवार मानसिक त्रास देत होता. यातूनच शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण देखील करत होता. घरगुती कारणातून चिडून जावून राजू शिंदे याने दि. 9 जानेवारी 2017 रोजी पत्नीला भरदिवसा दुपारी 4 वाजता तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. या सर्व थरारक घटनेने परिसर हादरुन गेला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विवाहितेला उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
भाजलेल्या विवाहितेवर उपचार सुरु केल्यानंतर ती 90 टक्के भाजल्याचे समोर आले. या दरम्यान तिचा जबाब देखील घेण्यात आला. उपचार सुरु असताना दि. 11 जानेवारी रोजी विवाहितेचा मृत्यू झाला. मेढा पोलिस ठाण्यात पतीवर खूनाचा दाखल झाल्यानंतर सपोनि देवीदास कठाळे यांनी तपास करुन सातारा जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने ऍड. आशीर्वाद कुलकर्णी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. मृत्यूपूर्व जबाब, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच शास्त्रोक्त व भौतिक पुरावा या खटल्यात महत्वूपर्ण ठरला. न्यायाधिशांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीला जन्मठेप व 5 हजार रुपये दंड तो न भरल्यास 6 महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. सातारा जिल्हा न्यायालयातील प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलीस उप निरीक्षक राजेंद्र यादव, शिवाजी घोरपडे, भुईंज पोलीस ठाण्याच्या घार्गे, पो.कॉ.रोहित यादव, म.पो.ना. शेख, पो.हवा. जी. एच. फरांदे, शमशुद्दीन शेख, पो.कॉ. राजेंद्र कुंभार, अमित भरते, म.पो.कॉ. अश्‍विनी घोरपडे यांनी यावेळी सहकार्य केले.