सर्जा-राजाच्या जोडीने भूसंपादनमध्ये 9% चा धुमाकूळ
दलालांच्या मध्यस्थीने शेतकर्यांकडून भरपाईतील 9 टक्क्यांची कमाई, धुमाळची खातेंतर्गत चौकशी व्हावी
भूसंपादन प्रक्रियेत कमिशनगिरीने धुमाकूळ घालणाऱ्या सतीश धुमाळचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील भूसंपादन प्रक्रियेत शेतकर्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला देताना दलालांच्या मध्यस्थीने 9 टक्के कमिशन घेऊन अधिकारी सतीश धुमाळ किती मालामाल झाला असावा
भूसंपादन प्रक्रियेत कमिशनगिरीने धुमाकूळ घालणाऱ्या सतीश धुमाळचे एक-एक कारनामे समोर येत आहेत.
आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील भूसंपादन प्रक्रियेत शेतकर्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला देताना दलालांच्या मध्यस्थीने 9 टक्के कमिशन घेऊन अधिकारी सतीश धुमाळ किती मालामाल झाला असावा याचा अंदाज लावणे अशक्यच आहे. शेतकर्यांना संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला देण्यासाठी धुमाळने चक्क 9 टक्के कमिशनचा सौदा मांडला आहे. धुमाळने इतक्यावरच न थांबता दलालांच्या मध्यस्थीने मोबदला देण्याच्या आधीच शेतकर्यांकडून 9 टक्के कमिशनच्या रकमेचे चेक घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर नुकसान भरपाईचा लाभ खरा लाभार्थी सोडून तिसर्यालाच दिल्याचा प्रकारही धुमाळने केला आहे. धुमाळने या भूसंपादन प्रक्रियेत जादा मलिदा लाटण्यासाठी बोगस तक्रारदार देखील उभे केले आहेत. जेणेकरून सेटलमेंट करणे अधिक सोपे जाईल हाही याचा अर्थ होऊ शकतो. त्यामुळे धुमाळने भूसंपादनात किती भ्रष्टाचाराचा धुमाकूळ घातला आहे याचा विचार अधिकार्यांनी करावा. सतीश धुमाळवर आत्तापर्यंत झालेल्या आरोपांचा गांभीर्याने विचार करुन वरिष्ठांनी धुमाळची खातेंतर्गत चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.


