maharashtra

जिल्हा न्यायालयातही चोरट्याने साधला डाव; वकिलाच्या कोटासह 34 हजारांची चोरी


Thieves also plotted in district court; Theft of Rs 34,000 including lawyer's quota
जिल्हा न्यायालयातील ग्रंथालयातील महिला कक्षातून अज्ञात चोरट्याने महिला वकिलाचा कोट चोरला. या कोटामध्ये रोख 34 हजार रुपये, दोन पेन, चष्मा बॉक्स असा मुद्देमाल होता.

सातारा : जिल्हा न्यायालयातील ग्रंथालयातील महिला कक्षातून अज्ञात चोरट्याने महिला वकिलाचा कोट चोरला. या कोटामध्ये रोख 34 हजार रुपये, दोन पेन, चष्मा बॉक्स असा मुद्देमाल होता.
कोट व त्यामधील पैसे चोरीला गेल्याचे समोर आल्यानंतर कोर्टात खळबळ उडाली. त्या परिसरात सर्वत्र शोध घेतल्यानंतरही पैसे सापडत नसल्याने अखेर महिला वकील ऍड. सविता वसंत शिंदे (रा.शाहूनगर, सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ही घटना दि. 24 रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.