Satara

esahas.com

ना. मुरुगेश निराणी आणि ओमप्रकाश शेटे यांना कृष्णा विद्यापीठाची डी.लिट पदवी

कृष्णा अभिमत विद्यापीठाचा १० वा दीक्षांत सोहळा रविवारी ५ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न झाला. या सोहळ्यात कृष्णा हॉस्पिटलतर्फे पहिल्यांदाच डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली. कर्नाटक राज्याचे उद्योगमंत्री ना. मुरुगेश निराणी आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे सहाय्यक व मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते डी. लीट. पदवी बहाल करण्यात आली.

esahas.com

कृष्णा बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा उत्साहात

शेतकऱ्यांची हक्काची बँक अशी ओळख असलेल्या कृष्णा सहकारी बँकेने नोव्हेंबर २०२० मध्ये ५० व्या सुवर्णमहोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण केले होते. या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

esahas.com

मंगळवार पेठेत महावितरणची अंडरग्राऊंड लाईन

सातारा शहरातील मंगळवार पेठ परिसरातील लेले हॉस्पिटल ते फडके हॉस्पिटल या मार्गावर स्थानिक नगरसेवक सुहास राजेशिर्के यांच्या पाठपुराव्यानंतर महावितरणने हाय व्होल्टेज अंडरग्राऊंड लाईन टाकल्याने येथील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची समस्या दूर झाली आहे.

esahas.com

ज्ञान आणि कौशल्याचा समाजाच्या उद्धारासाठी उपयोग करा

उच्च शिक्षण आणि पदवी प्राप्त केल्यांनतर बहुतांशी जणांचा प्रोफेशनल करिअरकडे ओढा असतो. परंतु, त्याआधी युवा पिढीने आपल्या उमेदीच्या काळात ज्ञानाचा आणि कौशल्याचा समाजाच्या विकासासाठी व उद्धारासाठी उपयोग करावा. आरोग्याच्या क्षेत्रात काम करत असताना केवळ पैसा ही प्रेरणा न ठेवता समाजाची सेवा आणि ज्ञान प्रेरणास्थानी ठेवावे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, राज्याचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले.

esahas.com

जबरी चोरी व अपहरणाच्या गुन्ह्यातील संशयितांस चिकोडीतून अटक

जबरी चोरी व अपहरणाच्या गुन्ह्यातील संशयितांस कर्नाटकात जाऊन शिताफीने जेरबंद करण्याची अभिनंदनीय कामगिरी सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ यांच्या पथकाने केली आहे. यासिन गुलाब झाडवाले (वय 48 वर्षे) माज यासिन झाडवाले (वय 26, दोन्ही रा. गांधी मार्केट, चिकोडी, ता. चिकोडी, जि. बेळगाव राज्य कर्नाटक) यांच्या मुसक्या आवळून अपहरण केलेल्या व्यक्तिची सुटका करून  सातार्‍यात आणून शहर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

esahas.com

चोरीच्या गुन्ह्यातील एक लाख 60 हजारांचा मुद्देमाल पुसेगाव पोलिसांकडून जप्त

पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी व अन्य गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांनी चोरी केलेले काही मोबाईल व एक मोटारसायकल असा एकूण 1 लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पुसेगाव पोलिसांना यश आले आहे.

esahas.com

सातारा शहर आणि हद्दवाढीतील विविध विकासकामांसाठी १ कोटी

सातारा पालिकेत सत्ता असो वा नसो, सातारकरांच्या समस्या सोडवण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. सातारा शहरात सातत्याने असंख्य विकासकामे मार्गी लावणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहर आणि हद्दवाढीत समाविष्ट शाहूपुरी, शाहूनगर, गोळीबार आदी भागातील १३ विकासकामे मार्गी लावण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून १ कोटी ६ हजार ८८ रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

esahas.com

दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेत जागतिक अपंग दिन समाजहितैषी उपक्रमाने साजरा

दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेने जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर भरवले होते. या शिबिरामध्ये 30 रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपली समाजाविषयी असणारी तळमळ जोपासली आहे. यावेळी विविध मान्यवरांनी भेटून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आहे.

esahas.com

खंडाळ्याचे गटविकास अधिकारी बिचुकले ग्रामसेवकावर कारवाई करण्यास का बिचकतात?

शेडगेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका योगिनी चव्हाण या ग्रामपंचायतीचा मनमानी व बेशिस्त कारभार करत असल्याबद्दल शेडगेवाडी ग्रामस्थ खंडाळा गटविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करीत आहेत. तरीही गटविकास अधिकारी चव्हाण यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करताना दिसून येत नाहीत.

esahas.com

जिल्हाधिकार्‍यांच्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम पुढील असंख्य पिढ्या भोगणार : महारुद्र तिकुंडे

मोठ्या कष्टाने उभारलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सन 2017 साली निर्माण झाले. मात्र त्यानंतर या वास्तूचा प्रवास खडतर मार्गातून जात असताना कोविडच्या कालखंडात तो जम्बो कोविड सेंटरमध्ये रुपांतरित झाला. आणि आता तो शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या दिशेने सुरु असून ही वास्तू पुन्हा श्री छत्रपती शिवाजी संग्रहालयास परत मिळावी, अशा आशयाची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते आणि युवा राज्य फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे केली आहे.