maharashtra

खंडाळ्याचे गटविकास अधिकारी बिचुकले ग्रामसेवकावर कारवाई करण्यास का बिचकतात?


Why is Khandala's group development officer hesitant to take action against Bichukale Gram Sevak?
शेडगेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका योगिनी चव्हाण या ग्रामपंचायतीचा मनमानी व बेशिस्त कारभार करत असल्याबद्दल शेडगेवाडी ग्रामस्थ खंडाळा गटविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करीत आहेत. तरीही गटविकास अधिकारी चव्हाण यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करताना दिसून येत नाहीत.

सातारा : शेडगेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका योगिनी चव्हाण या ग्रामपंचायतीचा मनमानी व बेशिस्त कारभार करत असल्याबद्दल शेडगेवाडी ग्रामस्थ खंडाळा गटविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करीत आहेत. तरीही गटविकास अधिकारी चव्हाण यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करताना दिसून येत नाहीत.
याबाबत अधिक माहिती अशी, शेडगेवाडी, ता. खंडाळा ही ग्रामपंचायत छोटी असताना त्याठिकाणी विकासकामांचा बोजवारा उडालेला आहे. ग्रामस्थांना आरोग्यसेवाही व्यवस्थित मिळत नाहीत, गटाराचे पाणी ग्रा.पं. कार्यालयासमोरुनच वाहत आहे. पथदिवे बंद असल्यामुळे गल्लीबोळातील वातावरण अंधारमय झाले आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या विस्तारित इमारतीमध्ये फरशी बसविण्याचा ठेका स्वत:च्या जवळच्या माणसाला देण्यात आला आहे. त्याची कोणतीही एमबी उतरवलेली नाही. त्यामध्ये त्यांनी आर्थिक घोटाळा केलेला आहे. गावच्या कमानीवर बेकायदेशीररित्या कै. आनंदराव कोंडिबा वाघमोडे असे नामकरण केलेले आहे. त्यास ग्रामसभेची अथवा मासिक सभेची कोणतीही मंजूरी घेतलेली नाही. हम करे सो कायदा, या उक्तीप्रमाणे ग्रामसेविका योगिनी चव्हाण या वावरत आहेत. समाजाला विचारात न घेता इंग्रजशाही प्रमाणे त्यांचे कामकाज चाललेले आहे. ग्रामस्थांनी अथवा सदस्यांनी त्यांना सूचना करण्याचा प्रयत्न केल्यास मुझसे बढकर कोई नहीं, अशा अविर्भावात त्या वागतात. या ग्रामसेविकेची विस्ताराधिकारी घोलप यांनी चौकशी केली. त्यामध्ये त्या दोषी आहेत, असा अहवाल गटविकास अधिकारी खंडाळा यांना दिलेला असताना आर्थिक तडजोडीपायी त्यांनी चव्हाण यांच्यावर अद्याप कायदेशीर कारवाई केलेली नाही. त्यामुळे शेडगेवाडी ग्रामस्थांनी वरिष्ठांना निवेदन देवून आंदोलनाचा इशारा दिला आहे.