जबरी चोरी व अपहरणाच्या गुन्ह्यातील संशयितांस चिकोडीतून अटक
सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची अभिनंदनीय कामगिरी
जबरी चोरी व अपहरणाच्या गुन्ह्यातील संशयितांस कर्नाटकात जाऊन शिताफीने जेरबंद करण्याची अभिनंदनीय कामगिरी सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ यांच्या पथकाने केली आहे. यासिन गुलाब झाडवाले (वय 48 वर्षे) माज यासिन झाडवाले (वय 26, दोन्ही रा. गांधी मार्केट, चिकोडी, ता. चिकोडी, जि. बेळगाव राज्य कर्नाटक) यांच्या मुसक्या आवळून अपहरण केलेल्या व्यक्तिची सुटका करून सातार्यात आणून शहर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
सातारा : जबरी चोरी व अपहरणाच्या गुन्ह्यातील संशयितांस कर्नाटकात जाऊन शिताफीने जेरबंद करण्याची अभिनंदनीय कामगिरी सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ यांच्या पथकाने केली आहे. यासिन गुलाब झाडवाले (वय 48 वर्षे) माज यासिन झाडवाले (वय 26, दोन्ही रा. गांधी मार्केट, चिकोडी, ता. चिकोडी, जि. बेळगाव राज्य कर्नाटक) यांच्या मुसक्या आवळून अपहरण केलेल्या व्यक्तिची सुटका करून सातार्यात आणून शहर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आलेली माहिती अशी, 4 डिसेंबर रोजी 12.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी साहिल इमाम कोलकर रा. 185, रविवार पेठ सातारा हे प्रिती एक्झीक्युटीव्ह हॉटेल समोरील पान टपरीच्या मालाचे पेमेंट देण्याकरीता गेले होते. त्यावेळी ऑरेन्ज रंगाच्या एम.एच.06. ए.बी.3322 या चारचाकी वाहनातून ओळखीच्या चार जणांनी खाली उतरून मारहाण केली तसेच फिर्यादीच्या दुचाकी वाहनाच्या डिक्कीतून चार लाख रूपये रोख रक्कम, त्याच्या गळ्यातील दिड तोळे वजनाची सोन्याची चेन असा एकुण 4 लाख 55 हजार रूपयांचा मुद्देमालाची जबरी चोरी केली तसेच फिर्यादी यांचा लहान भाऊ निहाल कोलकर यास स्विफ्ट गाडीमध्ये घालून त्याचे अपहरण केले होते.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना गुन्ह्यातील आरोपीतांना ताब्यात घेण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार धुमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ यांच्या अधिपत्याखाली पथकास मार्गदर्शन करून संशयीत कोल्हापूर दिशेने चारचाकी वाहनातून गेले असल्याची माहीती दिली. तात्काळ गणेश वाघ यांच्या पथकाने कोल्हापूर दिशेन धाव घेत तासवडे, किनी, कोगनोळी टोलनाक्यावर वाहनाची माहिती घेत चिकोडी ता.चिकोडी जि.बेळगाव पर्यंत वाहनाचा पाठलाग सुरू करून चारचाकी वाहनाला गाठले. अखेर गाडी आडवी मारून सिनेस्टाईल थराराने अपह्त मुलाची सुटका करून यातील मुख्य दोन संशयीतांना जेरबंद केले व पुढील कार्यवाहीसाठी सातारा येथे आणून शहर पोलीसाच्या स्वाधीन केले.
या कारवाईत सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, रोहित निकम, विशाल पवार, अनिकेत जाधव यांनी सहभाग घेतला. पाच तासाच्या संशयीताचा पाठलाग करून् चिकोडीत जाऊ न जेरबंद करण्याच्या कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ व त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले.