chikodisuspectsarrestedforrobberyandkidnapping

esahas.com

जबरी चोरी व अपहरणाच्या गुन्ह्यातील संशयितांस चिकोडीतून अटक

जबरी चोरी व अपहरणाच्या गुन्ह्यातील संशयितांस कर्नाटकात जाऊन शिताफीने जेरबंद करण्याची अभिनंदनीय कामगिरी सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ यांच्या पथकाने केली आहे. यासिन गुलाब झाडवाले (वय 48 वर्षे) माज यासिन झाडवाले (वय 26, दोन्ही रा. गांधी मार्केट, चिकोडी, ता. चिकोडी, जि. बेळगाव राज्य कर्नाटक) यांच्या मुसक्या आवळून अपहरण केलेल्या व्यक्तिची सुटका करून  सातार्‍यात आणून शहर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.