सातारा : सातारा जिल्हा कोरोना संसर्गाच्या पाशातून आताशी कुठे बाहेर पडण्याच्या मार्गावर असतानाच अस्मानी संकटाने सर्वसामान्यांचे आणि शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी आशेने प्रशासनाकडे पाहत असतानाच सातारा जिल्हा परिषदेने लाखो रुपयांची उधळपट्टी करीत सो कॉल्ड अभ्यास दौरा आयोजित केला आहे. या अनाठायी खर्चाविरोधात माहिती अधिकार क...
राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची ओळखली जाणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन पदी माजी खासदार दिवंगत लक्ष्मणतात्या पाटील यांचे सुपुत्र नितीन लक्ष्मणराव पाटील यांची जिल्हा बँकेच्या चेअरमन पदी निवड झाली, तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात असल्यामुळे प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आणि सर्व कुटुंबीय गुण्यागोविंदाने एकत्र नांदत होते. परंतु सध्या संयुक्त कुटुंब व्यवस्थाच संपल्यामुळे किंवा मोडकळीस आल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. त्यांची काळजी घेणारे कुणीच नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवन जगत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे.
माण तालुक्यातील मोगराळे घाटात स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून गांजाची तस्करी करणार्या दोघांना पकडले. त्यांच्याकडून 1 लाख 61 हजारांचा गांजा आणि कार, मोबाइल असा सुमारे 9 लाख 84 हजार 680 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सातारा शहरातील बुधवार नाक्यावर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीसी) बंदी असलेल्या गुटख्यावर कारवाई केली. या कारवाईत 33 लाखाची गुटखा, 5 लाख 50 हजार रुपयांची रोकड व वाहन असा 12 लाख 82 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, गुटख्यावरील सलग कारवाईने गुन्हेगारांची पाळेमुळे समोर येणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
बँकेच्या एटीएममध्ये घुसून संशयास्पद कृत्य करणार्या दोन परदेशी नागरीकांना कराड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी ५ रोजी सायंकाळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याकडे तब्बल सत्तर बनावट एटीएम कार्ड आढळली आहेत. संबंधित नागरीक रोमानिआ देशातील असल्याची प्राथमिक माहिती चौकशीतून समोर आली आहे.
सुपने, ता. कराड येथे कार-दुचाकीच्या धडकेत दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. कराड-पाटण मार्गावर रविवारी ५ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. राकेश राजू चव्हाण व उदय रमेश चव्हाण दोघेही रा. सुपने ता. कराड अशी अपघातात जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत.
साखरेचे कार्ड काढून देतो असे सांगून पॅनकार्ड व आधारकार्ड घेऊन किसन उर्फ कृष्णा गणू पोळ (वय ९२) रा. शामगाव ता. कराड यांची ६ एकर १० गुंठे जमीन उंब्रज येथील दुय्यम निबंधक कार्यालयात फसवणूक करून खरेदी खत करून घेतलेल्या गावातील दोघा जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सातारा शहरातील बदामी विहिरीजवळ एका युवकावर तलवार, कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सहाजणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. संग्राम उर्फ लल्या भंडारे, तेजस मांढरे, नरु मांढरे, आदित्य गोसावी, यश जांभळे, धनू मांढरे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे असून यापैकी पाचजणांना अटक झाली आहे.
खिंडवाडी येथे १७ नोव्हेंबर तारखेला झालेला अमोल डोंगरे ह्या तरुणाचा खून हा नरबळी असल्याचे अनेक पुरावे समोर येत आहेत. त्या आधारे पोलिसांनी ह्या घटने मध्ये नरबळीच्या शक्यतेचा कसून तपास करावा आणि पिडीत कुटुंबाला न्याय द्यावा, असे निवेदन सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाला डॉ हमीद दाभोलकर प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, हौसेराव धुमाळ, वंदना माने, शंकर कणसे यांनी म.अंनिस मार्फत दिले आहे.