maharashtra

सातारा एटीसी ने केली अवैध गुटख्या विरोधात कारवाई

सुमारे 12 लाख 82 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक

Satara ATC takes action against illegal gutkha
सातारा शहरातील बुधवार नाक्यावर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीसी) बंदी असलेल्या गुटख्यावर कारवाई केली. या कारवाईत 33 लाखाची गुटखा, 5 लाख 50 हजार रुपयांची रोकड व वाहन असा 12 लाख 82 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, गुटख्यावरील सलग कारवाईने गुन्हेगारांची पाळेमुळे समोर येणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

सातारा : सातारा शहरातील बुधवार नाक्यावर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीसी) बंदी असलेल्या गुटख्यावर कारवाई केली. या कारवाईत 33 लाखाची गुटखा, 5 लाख 50 हजार रुपयांची रोकड व वाहन असा 12 लाख 82 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, गुटख्यावरील सलग कारवाईने गुन्हेगारांची पाळेमुळे समोर येणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
इरफान पटेल (वय 41, रा.चाफळ ता.पाटण) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 4 रोजी एटीसी पथकाला सातार्यात बेकायदेशीर गुटख्याची वाहतुक होत असल्याचे समाजले. बुधवार नाक्यावरीर लकडी पुलालगत एक टेंम्पो जात असताना एटीसी पथकाच्या पोलिसांनी वाहन थांबवून चौकशी केली असता त्यामध्ये बांधलेली पोती होती. पोलिसांनी त्याबाबत चालकाला विचारले असता तो उत्तरे देत नव्हता. अखेर पोलिसांनी पाहणी केली असता वेगवेगळ्या कंपनीचा सुमारे साडेतील लाख रुपयांचा गुटखा होता. पोलिसांची ही झाडाझडती सुरु ठेवली असतानाच त्यांना पैशांचे घबाडच सापडले. संबंधित रोकड बाबत विचारणा केली असता चालक उत्तर देत नव्हता. पोलिसांनी रोकड मोजली असता ती साडेपाच लाख रुपयांची होती.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व मुद्देमाल जप्त केला. चालकाला ताब्यात घेवून त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. दरम्यान, ही कारवाई जिविशाचे पोनि नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एटीसीचे सपोनि संतोष साळुंखे, पोलिस हवालदार हणमंत भोसले, सागर भोसले, सुमीत मोरे, राहूल वायदंडे, मनोज दबडे, अनिकेत जाधव यांनी केली.