राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची ओळखली जाणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन पदी माजी खासदार दिवंगत लक्ष्मणतात्या पाटील यांचे सुपुत्र नितीन लक्ष्मणराव पाटील यांची जिल्हा बँकेच्या चेअरमन पदी निवड झाली, तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सातारा : राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची ओळखली जाणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन पदी माजी खासदार दिवंगत लक्ष्मणतात्या पाटील यांचे सुपुत्र नितीन लक्ष्मणराव पाटील यांची जिल्हा बँकेच्या चेअरमन पदी निवड झाली, तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आज जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये सर्व संचालकांची बैठक घेण्यात आली. यामध्ये भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. सकाळपासूनच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हा बँकेच्या आवारामध्ये उपस्थित होते. मात्र झालेल्या या संचालकांच्या बैठकीमध्ये नितीन लक्ष्मणराव पाटील यांचे नाव बिनविरोध म्हणून जाहीर करण्यात आले, तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांचे नाव सर्वानुमते बिनविरोध म्हणून घोषित करण्यात आले.


