पुसेगाव, ता. खटाव ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी संपूर्ण गावामध्ये "निर्जंतुकीकरण मोहीम" राबविण्यात आली. श्री सेवागिरी महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावात मशीनच्या साहाय्याने औषध फवारणी करून हे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे जे नागरिक पालन करीत नाहीत अशांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. जे हॉटेल, रेस्टॉरंट नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर पोलीस विभागाने कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
हॅपी न्यू ईअर, इंग्रजी नववर्षानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! 2022 या नववर्षाचे स्वागत आणि 2021 या वर्षाला निरोप देण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात. 31 डिसेंबर रोजी त्याचे आगळे वेगळे सेलिब्रेशन देखील ठरलेले असेल, असो. या आनंद सोहळयात नववर्षाचे स्वागत आप्तस्वकीयांबरोबरच करा. हा आनंद आपल्या आठवणीच्या गोड कूपीत जपून ठेवतांना काही अनर्थ होणार नाही याची काळजी घ्या. अगदी असेही म्हणेण की, हॅपी न्यू ईअर साजरा करा पण घरच्या घरी.. कारण कोरोना अजून संपलेला नाही..
येथील कृष्णा हॉस्पिटलच्या हृदय शस्त्रक्रिया विभागात एका ९५ वर्षाच्या वृद्ध महिलेवर नुकतीच बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. एवढ्या वयस्कर महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टर्सचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
ओमायक्रॉन चा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नववर्षाचे स्वागत घरातच साधेपणाने करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. नववर्ष स्वागताची नियमावली त्यांनी आदेशाद्वारे जाहीर केली.
देशाच्या जडणघडणीत खूप मोठे योगदान देणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई येथील काँग्रेस भवन येथे काँग्रेस सेवक व सातारचे सुपुत्र दीपक मोतलिंग यांचा सत्कार करण्यात आला. गेली पस्तीस वर्षे ते काँग्रेस भवन येथे सेवा बजावत आहेत.
जेव्हाही तुम्ही एसी चालू ठेवून गाडी चालवता तेव्हा त्याचा कारच्या मायलेजवर परिणाम होतो. पण, अनेकांना असा देखील प्रश्न पडतो की, जर आम्ही गाडी चालवली नाही आणि एसी चालू ठेवला तर त्यानुसार गाडीला इंधन खर्च होतो का? होतो तर मग तो किती खर्च होतो? अशा स्थितीत, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की एसीचा मायलेजवर किती परिणाम होतो आणि पार्क केलेल्या वाहनात एसी चालवल्यास किती पेट्रोल खर्च होतो? गाडीचा एसी कसा काम करतो?
पुसेगाव, ता. खटाव पोलिस ठाणे हद्दीतील कुख्यात गुंड दत्तात्रय दादासो मसुगडे (वय 22, रा. रणसिंगवाडी, ता. खटाव) याला माण, खटाव, कोरेगाव, फलटण या चार तालुक्यातून एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले असल्याचे पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदिप शितोळे यांनी सांगितले.
मालट्रक चालकाने कच्चे लोखंड आणि रोख रकमेच्या अपहार केला. ५ टन कच्चे लोखंड व ४५ हजाराची रोख रकमेचा अपहार केल्याने ट्रक मालकाने कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मालट्रक चालकाला अटक केली आहे.
येथील दत्त चौकाजवळ बुधकर चाळीनजीक एका युवकावर चाकूने वार केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली होती. यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान बुधवारी पहाटे रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.