पुसेगाव, ता. खटाव पोलिस ठाणे हद्दीतील कुख्यात गुंड दत्तात्रय दादासो मसुगडे (वय 22, रा. रणसिंगवाडी, ता. खटाव) याला माण, खटाव, कोरेगाव, फलटण या चार तालुक्यातून एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले असल्याचे पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदिप शितोळे यांनी सांगितले.
खटाव : पुसेगाव, ता. खटाव पोलिस ठाणे हद्दीतील कुख्यात गुंड दत्तात्रय दादासो मसुगडे (वय 22, रा. रणसिंगवाडी, ता. खटाव) याला माण, खटाव, कोरेगाव, फलटण या चार तालुक्यातून एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले असल्याचे पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदिप शितोळे यांनी सांगितले.
गुंड दत्तात्रय मसुगडे याच्या विरुध्द दहिवडी, पुसेगाव पोलिस ठाण्यात दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. पुसेगाव पोलिस ठाण्यातील दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातून नुकतीचे त्याची जामिनावर सुटका झाली. तो जामिनावर सुटताच हद्दपार प्राधिकरण तथा पोलिस अधिक्षक अजय बन्सल यांच्या हद्दपार आदेशान्वये दत्तात्रय मसुगडे यास बुधवारी (दि. 29) रोजी सहायक पोलिस निरीक्षक संदिप शितोळे यांनी पुढील एक वर्षाकरीता चार तालुक्यातून हद्दपार केले आहे. पोलिस अधिक्षक अजय बन्सल व उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अशाचप्रकारे समाजात चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे शितोळे यांनी सांगितले.


