Satara

esahas.com

गोटेत रिमोटद्वारे वीज मीटर नियंत्रित करून वीज चोरी

गोटे, ता. कराड येथे रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने वीज मीटर नियंत्रित करून वीज चोरी केल्याची घटना उघडा झाली आहे. याप्रकारे गेल्या वर्षभरात तब्बल 2 लाख 40 हजार 305 युनिट इतकी वीज चोरी केली असून त्याची किंमत तबल  27 लाख 57 हजार 400 रुपये आहे. वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने गोटे येथील पी.बी. पॉलीमर्सवर ही कारवाई केली.

esahas.com

वाईत मशीनमध्ये अडकून महिलेचा मृत्यू

वाईच्या एमआयडीसी मधील गरवारे वालरुप्स कंपनीच्या नेट प्रोसेस विभागात सौ.छाया संतोष बोधे (वय ३५, रा. रविवार पेठ, वाई) यांचा मशीनच्या दोरी मध्ये पाय अडकल्याने व त्या मशीनला वेग असल्याने दोरीसोबत त्या जमीनीपासून २० फुट ऊंचीवर असलेल्या मशीनमध्ये क्षणार्धात ओढल्या गेल्या. त्यांचा मशीनमध्ये अडकून जागीच मृत्यू झाल्याने कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

esahas.com

होर्डिंग लावताना विजेच्या धक्क्याने युवक जखमी

येथील भूविकास बँकेच्या चौकात शिवजयंती चे बॅनर लावताना विजेच्या धक्क्याने एक युवक जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. जखमी झालेल्या युवकाला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यामुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

esahas.com

ज्यांना इनोव्हेटिव्ह सातारा शब्दाचे स्पेलिंग येत नाही, त्यांनी याबाबत बोलू नये

लोकांच्या हितासाठी काम करण्याची आमची एक पध्दत आहे. आमची धडाडी व लोकप्रियता खुपणाऱ्यांकडून आमच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. सहकारात स्वाहाकार करणारे आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशा घणाघाती शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आरोपांना नाव न घेता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

esahas.com

मलकापूर पालिकेचे अंदाजपत्रक कोणत्याही करवाढीशिवावाय मंजूर

मलकापूर नगरपालिकेचे सन २०२२-२३ या सालाचे अंदाजपत्रक विशेष सभेमध्ये एकमताने मंजुर करण्यात आले. या अंदाजपत्रकामध्ये कोणतीही कर वाढ न करता नाविण्यपुर्ण योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

esahas.com

महावितरणने बिल न दिल्यास काम बंद करणार

अवर्षण, अतिवृष्टी, भारनियमन इत्यादी परिस्थितीमध्ये महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्ही वेळोवेळी काम करतो. मात्र ठेकेदारांची बिले सहा-सहा महिने प्रलंबित राहतात. त्यामुळे आम्हाला प्रचंड आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. यासंदर्भात येत्या आठ ते दहा दिवसात निर्णय न झाल्यास आम्ही सर्व कामे बंद करू, असा इशारा सातारा जिल्हा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

esahas.com

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटीबध्द

पाटण विधानसभा मतदार संघातील नागरीकांच्या अडीअडचणी जाग्यावरच  सोडविण्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारास नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

esahas.com

पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणच्या डोंगरकपारीपर्यंत विकास केला

काजारवाडी ते गोटेवाडीला जोडणाऱ्या साकव पुलाच्या कामासाठी ४ वर्ष अविरतपणे पाठपुरावा सुरू होता. हे काम करण्याचे आपले कर्तव्य असल्याचे सांगत पृथ्वीराज बाबांनी कराड दक्षिणच्या डोंगरकपारीपर्यंत निधी पोहचवत विकास केला आहे. बाबांच्या माध्यमातून आत्तापर्यंत दक्षिणेत अनेक कामे केली असून यापुढेही आणखी कामे करू, असे मत इंद्रजित चव्हाण यांनी व्यक्त केले.

esahas.com

श्री शिवनाथ  मुळे, (गुरूजी) यांची चेअरमन पदी निवड 

नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा संत नामदेव सहकारी पतसंस्था मर्यादित , सातारा पंचवार्षिक निवडकीचे सर्व  जागा बिनविरोध झाल्या असून श्री. शिवनाथ जगन्नाथ मुळे  यांची सलग सहाव्यांदा संस्थेच्या चेअरमन पदी निवड झाली

esahas.com

बेपत्ता पोलिस अधिकारी संग्राम ताटे बेशुध्द अवस्थेत सापडले

जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बेपत्ता असलेले पोलिस निरीक्षक संग्राम ताटे मूळ रा. मारुल, ता.कराड, सातारा हे अखेर १३ दिवसानंतर बेशुध्द अवस्थेत सापडले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस अधिकारी गायब झाल्याने महाराष्ट्र पोलिस दल हादरुन गेला. या दरम्यान, शिरवळ येथे ताटे सापडले असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले आहे.