एका युवकाने सातारा शहर परिसरात वास्तव्य करत असणाऱ्या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दरम्यान त्या युवकाच्या आईने व भावाने तिला मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
भोसले यांनी स्वत:च्या मालकीच्या जागेतून गावासाठी पायवाट दिली. मात्र गावातील काहीजणांनी संगनमताने या पायवाटेचे रुपांतर दुसर्या जागेतून सव्वा आठ फुटी रस्त्यात केल्याची घटना म्हावशी, ता. जावली येथे घडलेली आहे. तहसिलदारांची दिशाभूल करुन हा रस्ता करण्यात आला असून याबाबतच्या चौकशीची मागणी निवेदनाद्वारे सातारा जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
साताऱ्यातील जावळी तालुक्यात असणाऱ्या सनपाने गावातील ओंकार पवार युपीएससी परीक्षेत १९४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. गावात राहून अभ्यास करत त्यांने या परीक्षेत मिळवलेले यश महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 (नविन क्र. 48) पुणे सातारा कि. 725.000 ( शेंद्रे-सातारा) ते 865..350 (देहू रोड जंक्शन) एकूण लांबी 140.35 कि.मी. हा महामार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे यांच्या कक्षेत येतो. या महामार्गालगत खालीलप्रमाणे अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे.
जिल्ह्यातील डोंगरी भागात जास्त पाऊस होतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने त्यांचे तात्पुरते स्थलांतर शाळांमध्ये करा. याबरोबरच सर्व विभागांनी संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्ह्यातील साखर कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी त्वरित दुसरा हप्ता ऊसउत्पादकांना द्यावा, त्यासाठी आपण स्वतः आदेश काढावेत, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली.
कराड ते विटा महामार्गावरील येथील कृष्णा नदीवर झालेला नवीन कृष्णा पूल दुपारपासून वाहतुकीला खुला करण्यात आला. पुलाचे काम तब्बल तीन वर्षे सुरू असल्याने पूल बहुचर्चित होता. त्यासाठी तब्बल ३५ कोटींचा खर्च आला आहे. पूल तब्बल ३२० मीटरचा आहे. पुलाखाली ४० मीटरचे आठ गाळे आहेत.
सातारा जिल्ह्यातील ११ एकात्मिक नागरी सुविधा केंद्र (सेतू) चुकीच्या पद्धतीने टेंडर पद्धती राबविण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर सुट्टीच्या कोर्टासमोर तातडीची सुनावणी सोमवारी (दि.३०) पार पडली.
गंभीर गुन्ह्यातील संशयिताला पाण्याची बाटली देण्यास विरोध केल्याने साताऱ्यातील मटकाकिंग समीर सलीम शेख (रा.मोळाचा ओढा, सातारा) याने जिल्हा व सत्र न्यायालयात कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना घडली.
लडाख प्रदेशात कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांच्या पार्थिवावर आज विसापूर ता. खटाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील नागरिक व आजी-माजी सैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.