maharashtra

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

तीन जणांवर गुन्हा दाखल

Atrocities on young women by showing the lure of marriage
एका युवकाने सातारा शहर परिसरात वास्तव्य करत असणाऱ्या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर  वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दरम्यान त्या युवकाच्या आईने व भावाने तिला मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सातारा : एका युवकाने सातारा शहर परिसरात वास्तव्य करत असणाऱ्या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर  वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दरम्यान त्या युवकाच्या आईने व भावाने तिला मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा येथे वास्तव्य करीत असलेल्या एका २३ वर्षीय युवतीला सैराज रफिक फरास, वय २५, रा. माची पेठ, सातारा याने लग्नाचे आमिष दाखवून दि. ११ मे २०२२ ते दि. २२ मे २०२२ या कालावधीमध्ये सातारा येथील कमानी राऊत परिसरातील एका घरात, विशाळगड, जि. कोल्हापूर येथे, महाबळेश्वर आणि सातारा येथील औद्योगिक वसाहत येथे असणाऱ्या भाड्याच्या घरात त्या युवतीवर अत्याचार केले. याबाबत कोणालाही सांगितल्यास युवतीला व तिच्या भावाला जिवंत मारण्याची तसेच समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. दरम्यान, दि. २२ मे रोजी त्या युवकाची आई चांदबेबी रफिक फरास, भाऊ सकलेन फरास यांनी या युवतीला मारहाण केल्याने त्यात ती जखमी झाली. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिने याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.