श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त अप्पासाहेब देशमुख यांना ईडीने अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना २४ जूनपर्यंत ईडीची कोठडी ठोठावली आहे. अप्पासाहेब देशमुख यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
सातारा शहर परिसरात वास्तव्य करीत असणार्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी विशाल संपत देशमुख वय 32, रा. विलासपूर, ता. सातारा याला न्यायालयाने 3 वर्ष सक्तमजुरी व 500 रुपये दंड दंड न दिल्यास 15 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
येथील देगाव फाटा परिसरात प्रवासातून एका अनोळखी महिलेने 1 लाख 16 हजार 900 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा शहर परिसरात एका युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी अभय प्रकाश साठे वय 27, रा. फॉरेस्ट कॉलनी समोर,विलासपूर, सातारा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा शहरानजिक असलेल्या वीज कंपनीच्या ट्रान्सफार्मरमधील तांब्याची तार अज्ञात चोरट्याने चोरुन नेण्यात आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रविवार पेठ, सातारा येथून दागिन्यांची चोरी झाली. विशेष म्हणजे अज्ञाताने स्टील डब्यातून हे दागिने नेले. ही घटना १५ जून रोजी दुपारी तीनच्या दरम्यान घडली. या चोरीनंतर वासंती चंद्रकांत महापरळे रा. लोणार गल्ली, रविवार पेठ, सातारा यांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
कोणते मंत्री संत्री भ्रष्टाचार खंडणी संदर्भात काय बोलले मला माहित नाही. तुमच्यात हिंमत आहे, समोर येऊन आरोप करा. आपण दोघेही चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जाऊ, असे थेट आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी अजितदादा पवार यांचे नाव न घेता दिले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च एप्रिल २0२२ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परिक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये सातारा जिल्ह्याचा ९८.२९ टक्के निकाल लागला. यामध्ये नेहमीप्रमाणे मुलींचीच बाजी लागली आहे. संपूर्ण विभागाच्या निकालाची तुलना करता सातारा जिल्ह्याचा निकाल ९८.२९ टक्के लागला असून विभागात दुसरा क्रमांक आला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीकडून सलग दोन ते तीन दिवसांपासून चौकशी होत आहे. या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारकडून ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे केंद्रातील भाजपच्या हुकूमशाही आणि दबावतंत्रविरोधात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीवतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
कोरेगाव डीवायएसपी व पुसेगाव पोलिसांच्या सहकार्याने शासकीय मातीची चोरी करणारी टोळी ताब्यात घेत गाळमातीने भरलेली वाहने व मोकळी वाहने असा एकूण 1,00,10000 रक्कमेची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पुसेगाव चे सहायक पोलीस निरीक्षक संदिप शितोळे यांनी दिली.