सातारा शहर परिसरात एका युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी अभय प्रकाश साठे वय 27, रा. फॉरेस्ट कॉलनी समोर,विलासपूर, सातारा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातारा शहर परिसरात एका युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी अभय प्रकाश साठे वय 27, रा. फॉरेस्ट कॉलनी समोर,विलासपूर, सातारा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ऑक्टोंबर 2021 ते 2 फेब्रुवारी 2022 पर्यंत सातारा येथील गोडोली नाका, राजवाडा परिसर येथे सातारा येथील उपनगरात वास्तव्य करणार्या एका 21 वर्षीय युवतीचा अभय साठे याने दुचाकीवरून पाठलाग करून तिच्याकडे प्रेमाची मागणी केली. तिचा हात धरून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तू लग्न केले नाहीस तर मी जीव देईन आणि घेईनही, अशी धमकी दिल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


