maharashtra

जिल्ह्यात दहावीचा निकाल ९८.२९ टक्के

विभागात दुसरा क्रमांक; नेहमीप्रमाणे मुलींचीच बाजी

Tenth result in the district is 98.29 percent
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च एप्रिल २0२२ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परिक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये सातारा जिल्ह्याचा ९८.२९ टक्के निकाल लागला. यामध्ये नेहमीप्रमाणे मुलींचीच बाजी लागली आहे. संपूर्ण विभागाच्या निकालाची तुलना करता सातारा जिल्ह्याचा निकाल ९८.२९ टक्के लागला असून विभागात दुसरा क्रमांक आला आहे.

सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च एप्रिल २0२२ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परिक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये सातारा जिल्ह्याचा ९८.२९ टक्के निकाल लागला. यामध्ये नेहमीप्रमाणे मुलींचीच बाजी लागली आहे. संपूर्ण विभागाच्या निकालाची तुलना करता सातारा जिल्ह्याचा निकाल ९८.२९ टक्के लागला असून विभागात दुसरा क्रमांक आला आहे.
यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली. दोन वर्षे परिक्षा आणि लिखाणाच्या सरावापासून दुर असलेल्या विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी अतिरिक्त वेळही देण्यात आला होता. मात्र, दोन वर्षे  परिक्षेला सामोरे न गेलेल्यांसाठी ही परिक्षा देणे आव्हानात्मक होते.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थी आणि पालकांना मोठी उत्सुकता दिसून आली. त्यानुसार शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट दुपारी १ वाजल्यापासून खुली करण्यात आली. ती पाहण्यासाठी सायबर कॅफेवर प्रिंट काढण्यासाठी गर्दी करण्यात येत होती. यंदाच्या निकालात वाई, जावली या तालुक्यांनी बाजी मारली आहे. उत्तीर्ण होण्यात मुलींनी बाजी मारत आघाडी कायम राखली आहे. त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत ०.५१ टक्क्यांनी अधिक आहे
सातारा जिल्ह्यात माध्यमिकच्या एकूण शाळा ७३२ तर ११६ परीक्षा केंद्रे होती. तर उपकेंद्रे ६४७ होती. यासाठी ३८ हजार ७६१ नियमीत विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये ३८ हजार ६0१ जण प्रविष्ठ विद्यार्थी ठरले. तर ३७ हजार ९४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सातारा जिल्ह्याचा ९८.२९ टक्के निकाल लागला आहे. तर पुन: प्रविष्ठ विद्यार्थ्यामध्ये नोंदणी केलेले विद्यार्थी १२२0 तर प्रविष्ठ विद्यार्थी १२0१, उत्तीर्ण विद्यार्थी ९५३ असून याचे टक्केवारी ७९.३५ टक्के राहिली आहे. संपूर्ण विभागाच्या निकालाची तुलना करता सातारा जिल्ह्याचा निकाल ९८.२९ टक्के लागला असून विभागात दुसरा क्रमांक आला आहे.